Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड नागा चैतन्यच्या लूकने नव्हे तर घड्याळाने वेधले चाहत्यांचे लक्ष, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

नागा चैतन्यच्या लूकने नव्हे तर घड्याळाने वेधले चाहत्यांचे लक्ष, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. याच चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य याचा जन्म 23 नोव्हेंबर 1986 मध्ये झाला होता. तेलुगू चित्रपटातील तो एक मोठं नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता म्हणून काम केले आहे. आपल्या वडिलांप्रमाणे तोदेखील लग्झरी लाईफस्टाईल जगतो.

वडील सुपरस्टार असल्यामुळे लहानपणापासूनच नागा चैतन्यही (Naga Chaitanya) चित्रपटांकडे आकर्षित झाला. त्यानेही आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत या क्षेत्राची निवड केली आहे. नागा चैतन्यचे घर हैदराबादमध्ये आहे. सध्या साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य त्याच्या ‘धूथा’ या वेब सीरिजमुळे सतत चर्चेत आहे. या मालिकेद्वारे नागाने ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे.

याशिवाय अभिनेता सध्या शूटिंगच्या तयारीत व्यस्त आहे. दिग्दर्शक चंदू मोंडेती यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटात नागा चैतन्यसोबत सई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच झाली होती. दरम्यान, एका दाक्षिणात्य अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नागा चैतन्य चालताना दिसत आहे. पण एक गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नागा चैतन्यने त्याच्या हातात घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून तुमचेही होशांना उडवू शकतात. या घड्याळाची किंमत एवढी आहे की, सामान्य माणूसही या घड्याळाने आपल्या स्वप्नातील घर खरेदी करू शकतो. या किमतीत लक्झरी कारही सहज खरेदी करता येते. आता याची किंमत किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया.

 साउथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या नागा चैतन्यची एकूण संपत्ती 154 कोटी रुपये आहे. सुपरहिट चित्रपटांव्यतिरिक्त कलाकार जाहिरात आणि व्यावसायिक क्षेत्रातही भरपूर कमाई करत आहेत. अलीकडेच चैतन्यने हैदराबादमध्ये पाटेक फिलिप घड्याळ घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लग्झरी घड्याळाची किंमत 74.48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे घड्याळ चंदेरी रंगाचे डायल आणि काळ्या रंगाच्या बँडसह अगदी उत्कृष्ट दिसते. पण या घड्याळाची किंमत ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. (Superstar Nagarjuna son actor Naga Chaitanya watch cost Rs 74.48 lakh)

आधिक वाचा-
‘तो’ बॉलिवूड अभिनेता नसता, तर रजनीकांत यांनी कधीच हवेत फेकली नसती सिगारेट
‘सुपरस्टार’ शब्द देखील छोटा वाटावा असे स्टारडम मिळवणारे रजनीकांत अभिनयात आले तरी कसे?

हे देखील वाचा