कलाकार त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि शूटिंग करत असतात. प्रत्येक सीन परफेक्ट होण्यासाठी कलाकरांना खूप कष्ट घ्यावे लागतात. एक सीन शूट करण्यासाठी बरेच रिटेक होतात. कधीकधी आऊटडोर शूटिंग करताना कलाकरांना नैसर्गिक संकटाना देखील तोंड द्यावे लागते. मात्र असे असूनही आपले कलाकार त्यांचे काम पूर्ण निष्ठेने पार पडतात. सिनेमांचे शूटिंग होताना अनेक अविस्मरणीय आणि मजेदार किस्से घडत असतात, जे चित्रपटांनंतरही कायमस्वरूपी लक्षात राहतात. सध्या असच एक अनेक दशकांपूर्वी किस्सा खूपच गाजत आहे.
हा किस्सा आहे, राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या सुपरहिट ‘रोटी’ चित्रपटाशी संबंधित. राजेश खन्ना आणि मुमताज यांनी जवळपास दहा सिनेमे सोबत केले. या दोघांची जोडी देखील सुपरहिट होती. मुमताज यांनी या चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर किस्सा एका मुलाखतीदरम्यान सर्वांना सांगितला. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा हा किस्सा खूपच मजेशीर आणि राजेश खन्ना, मुमताज यांच्यातल्या गोड भांडणाचा आहे.
‘रोटी’ सिनेमाच्या एका सीनमध्ये राजेश खन्ना यांना मुमताज यांना त्यांच्या खांद्यावर उचलून चालायचे होते. पण हा सीन शूट करण्यासाठी त्यांना आठ दिवसाचा कालावधी लागला होता. या सिनेमाचा क्लायमॅक्स सीनमध्ये मुमताज यांना खांद्यावर घेऊन राजेश खन्ना यांना बर्फात पाळायचे होते. जेव्हा या सीनची शूटिंग सकाळी सुरु व्हायची तेव्हा राजेश खन्ना मुमताज यांना म्हणायचे की, “ये जाडी चल ये.” लगेच मुमताज देखील उडी मारून त्यांच्या खांद्यावर बसायच्या. हा सीन शूट करण्यासाठी त्यांना आठ दिवस लागले. यादरम्यान ते दोघं खूप हसायचे, मजा मस्ती करायचे.
मुमताज यांनी सांगितले की, “बर्फात मला उचलून चालणे राजेश खन्नांसाठी खूपच अवघड होते. मी शूटिंग सुरु झाली की, राजेश खन्ना यांच्यासोबत मजाक करायला सुरुवात करायची. ‘आता उचला खांद्यावर १०० किलोची गोनी’ असे मी नेहमी त्यांना बोलायची. त्यावर राजेश खन्ना म्हणायचे, “इतकी जड पण नाहीये तू.” मात्र तवा मी खूप स्लिम अजिबातच नव्हती.”
राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार होते त्यांनी एकापाठोपाठ एक असे १५ सिनेमे सुपरहिट दिले होते. त्यांचे हे रेकॉर्ड आजही तसेच आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज