बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पटानी ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला होता, जो चाहत्यांकडून पसंत केला गेला. यानंतर या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे रिलीझ झाले. चाहत्यांना यातील सलमान आणि दिशाची केमिस्ट्री भलतीच आवडली. आता निर्मात्यांनी या गाण्याच्या पडद्यामागील सीन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सलमान दिशाबद्दल बोलत आहे. सोबतच तो दोघांच्या वयाचीही थट्टा करताना दिसत आहे.
सलमान म्हणतो की, “दिशाने चांगले काम केले आहे. खूप सुंदर अभिनेत्री आहे. ती माझ्या वयाची नाही, तर मी तिच्या वयाचा दिसत आहे.” विशेष म्हणजे या सर्वात प्रेक्षकांचे लक्ष ज्या गोष्टीने वेधले, ती म्हणजे ट्रेलरमधील किसिंग सीन. या सीनची चांगलीच चर्चा झाली होती. चाहते दोघांचा किसिंग सीन पाहून चकित झाले होते, कारण सलमान कधीच ऑनस्क्रीन किसिंग सीन देत नाही. आता स्वत: त्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
किसिंग सीनवर सलमानचे वक्तव्य
सलमानने किसिंग सीनबद्दल बोलताना म्हटले की, त्याने दिशाला थेट किस केले नव्हते. तो म्हणाला, ‘या चित्रपटात एक किसिंग सीन नक्की आहे, परंतु दिशासोबत नाहीये. टेपवर आहे किस, टेपवर.’
तसं सलमान खानच्या खुलाला करण्यापूर्वीपासूनच सोशल मीडियावर काही युजर्सनी या गोष्टीचा खुलासा केला होता. खरं तर त्यांनी सलमानच्या किसिंग सीनबद्दल सांगितले होते की, दिशाच्या तोंडावर टेप लावली आहे आणि सलमान खान टेपवर किस करतोय.
स्वत: सांगितले होते का नाही करत किसिंग सीन
सलमान खानने आपल्या नो किसिंग पॉलिसीबद्दल इंडिया टुडेशी बोलताना सांगितलेे होते की, “जेव्हा आम्ही कुटुंबासोबत एकत्र चित्रपट पाहतो आणि किसिंग सीन येतो, तेव्हा आम्ही सर्वजण इकडे- तिकडे पाहू लागतो. ते खूप विचित्र दिसते. इतकेच नाही, तर ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातही इंटिमेट सीन थेट नव्हते. ट्रेंड बदलला, परंतु मी आताही बोल्ड सीनमुळे अस्वस्थ होतो. जेव्हा मी चित्रपट बनवतो, तेव्हा हाच विचार करून बनवतो की सर्व कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल. जास्तीत जास्त मी माझा शर्ट काढतो. आपल्या डायलॉग्जमध्ये काही मजेशीर जोक्सही टाकतो, परंतु तुम्ही मला लव्ह मेकिंग सीन करताना पाहणार नाहीत.”
‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. प्रभू देवा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १३ मे रोजी रिलीझ होणार आहे. चित्रपट तुम्ही चित्रपटगृहांव्यतिरिक्त झी ५वर ‘पे पर व्ह्यू’ सर्व्हिस झी प्लेक्ससोबत आणि प्रमुख डीटीएच ऑपरेटर म्हणजेच डिश, डी२एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवर पाहू शकता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती
-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…