Sunday, February 23, 2025
Home कॅलेंडर शाहरुखची बॉलिवूडमधील ३० वर्षे पूर्ण, वाचा कुणालाही मोडता न आलेले ‘किंग खान’चे बॉक्स ऑफिसवरील ‘हे’ ५ विक्रम

शाहरुखची बॉलिवूडमधील ३० वर्षे पूर्ण, वाचा कुणालाही मोडता न आलेले ‘किंग खान’चे बॉक्स ऑफिसवरील ‘हे’ ५ विक्रम

हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये ज्याची गणना होते, तो बॉलिवूडमधील चमकता तारा म्हणजे शाहरुख खान होय. शाहरुख खान याने बॉलिवूडमधील आपली ३० वर्षे पूर्ण केली आहेत. शाहरुखने जगभरात बॉलिवूडचा किंग म्हणून ओळख मिळवली आहे. मात्र, ही ओळख मिळवण्यासाठी त्याला खूपच खस्ता खावा लागला आहे. त्याने त्याच्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत असे काही सिनेमे दिले आहेत, जी येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत चाहत्यांच्या स्मरणात कायम राहणार आहेत.

‘या’ सिनेमातून शाहरुखने ठेवले होते बॉलिवूडमध्ये पाऊल
सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याने १९९२ साली आलेल्या ‘दीवाना’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याने यापूर्वी टीव्ही मालिकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या त्याच्या ५ सिनेमांबद्दल जाणून घेऊया.

१. सन १९९०च्या दशकानंतर ‘किंग खान’ शाहरुखच्या नावावर सर्वाधिक बॉक्स ऑफिसचं खातं उघडणाऱ्या सुपरहिट सिनेमांचा विक्रम आहे. या यादीत शाहरुखच्या ६२ सिनेमांपैकी १६ सिनेमांचे नाव सामील आहे.

२. शाहरुखच्या नावावर वर्षाकाठी जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांचा विक्रम आहे. बॉलिवूड सिनेमांच्या यादीत शाहरुखच्या ९ सिनेमांचा समावेश आहे.

३. १९९०च्या दशकानंतर शाहरुख हा एकमेव असा अभिनेता आहे, ज्याने २००६ आणि २०१४मध्ये कोणत्याही नॉन-हिट सिनेमांनंतर सलग १० हिट सिनेमे दिले आहेत.

४. शाहरुख खानच्या नावावर सर्वाधिक जागतिक पातळीवर सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे देण्याचा विक्रमही आहे. सन २००० ते २००४मध्ये त्याच्या सिनेमांनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.

५. शाहरुख खान याने १९९०च्या दशकानंतर एका वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्याच्या रुपात आपली जागा फिक्स केली आहे. सन १९९५मध्ये त्याच्या सिनेमांची १० कोटींहून अधिक तिकीटे विकली गेली होती. हा एक असा विक्रम आहे, जो आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही. आताच्या हिशोबाने या तिकिटांची एकूण रक्कम मोजली, तर ती तब्बल ३००० कोटींपेक्षा जास्त होते.

हे देखील वाचा