सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीच आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करतात. अनेक कलाकार हे परदेशात आपल्या वाढदिवसाचा आनंद लुटतात. काही जण भारतातीलच छानशा ठिकाणी आपल्या आयुष्यातील खास दिवस साजरा करतात, तर काहीजण आपल्या घरीच वाढदिवस साजरा करतात. या कलाकारांमध्ये सुपरस्टार शाहरुख खानचाही समावेश होतो. शाहरुख मंगळवारी (०२ नोव्हेंबर) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येक वर्षी शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्या ‘मन्नत’ या घराबाहेर दूर ठिकाणांहून चाहते येतात. मात्र, यावर्षी असं होणार नाही. ‘मन्नत’बाहेर सध्या खूप शांतता आहे. वांद्रे येथे ड्यूटीवर असलेल्या एसीपींनी माध्यम प्रतिनिधी आणि चाहत्यांना ‘मन्नत’च्या दरवाजाजवळ थांबण्यापासून रोखले.
कुठे करणार वाढदिवस साजरा?
माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्याकडे शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीचा एक मेसेज आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शाहरुख त्याचा मुलगा आर्यन आणि कुटुंबासोबत अलिबाग येथील फार्महाऊसवर आहेत. तो यावेळी आपला वाढदिवस तिथेच साजरा करणार आहे.
आर्यन खानच्या तुरुंगातून सुटकेनंतर शाहरुख आपल्या कुटुंबासोबत अलिबाग येथील घरी वेळ घालवण्याची योजना करत असल्याच्या वृत्तांच्या एक दिवसानंतर ही गोष्ट समोर आली आहे. (Superstar Shahrukh Khan Celebrate His Birthday At His Farm House In Alibaug)
आर्यनच्या जामीन करारामुळे शाहरुख मुंबईत
आर्यन खान जामीनावर तुरुंगातून बाहेर आहे. मात्र, त्याला हा जामीन करारांतर्गत मिळाला आहे. जामीनाच्या अटींमध्ये त्याला मुंबईतच राहावे लागेल. तसेच, प्रत्येक शुक्रवारी एनसीबीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागेल. त्याला अं’मली पदार्थ प्रकरणासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीसाठी नेहमीच हजेरी लावावी लागेल. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीशी आर्यन संपर्क साधू शकत नाहीत.
अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यन तब्बल २६ दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात होता. त्यानंतर आर्यनचा गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर झाला होता. मात्र, तो शनिवारी (३० ऑक्टोबर) तुरुंगातून बाहेर पडला. यानंतर कुठे जाऊन शाहरुख आणि खान कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा सर्वांसमोर शाहरुखला ‘आय लव्ह यू अक्षय’ म्हणाली होती महिला चाहती; रंजक आहे ‘तो’ किस्सा