बॉलिवूड कलाकार हे नेहमीच विमानप्रवास करत असतात. अनेकदा विमानतळावर त्यांची इतर कलाकारांशी गाठीभेटी होतच असतात. मात्र, यावेळी एका अभिनेत्याची दुसऱ्या अभिनेत्याशी नाही, तर भारतीय क्रिकेटपटूंशी झाली आहे. तो अभिनेता इतर कुणी नाही, तर बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आहे. वरुणने मुंबई विमानतळावर भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली. यादरम्यानचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वी वरुण धवन (Varun Dhawan) याने शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) भेट घेतली. वरुणने शिखर धवनच्या भेटीचे फोटोही त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
वरुण धवन याने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तो शिखर धवनसोबत दिसत आहे. तसेच, दुसऱ्या फोटोत वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल भारतीय क्रिकेटपटूंसोबत दिसत आहे. फोटोत शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि शुबमन गिल हे क्रिकेटपटू पोझ देताना दिसत आहेत.
हे फोटो शेअर करत वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सकाळी ४ वाजता मला असे वाटले, जसे एखादा मुलगा कँडी शॉपमध्ये आहे. आपल्या भारतीय संघाला भेटून आणि त्यांच्या आगामी दौऱ्याबाबत चर्चा करून खूपच उत्साही आहे.” वरुणने लिहिले की, “यादरम्यान शिखर धवनने काही कोडीही विचारली.” खरं तर, शिखर धवन आणि भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वे संघाविरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी संपूर्ण संघ या मालिकेसाठी झिम्बाब्वेला रवाना झाला आहे.
At 4 in the morning I was like a boy in a candy shop. Got very excited to meet and chat with our men in blue
About their upcoming tour. Also @SDhawan25 asked me a couple of riddles ???? pic.twitter.com/DbknESJB0k— VarunDhawan (@Varun_dvn) August 13, 2022
त्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “आपापल्या फील्डमधील दोन धवन एकसोबत.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “धवन भावांची पावर.” अशाच प्रकारे दोन धवन एका फोटोत पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत.
वरुण धवनच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘बवाल’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत जान्हवी कपूर हीदेखील दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो ‘भेडिया’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! अभिनेता अविष्कार दारव्हेकर दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत, पत्नीसोबतचा फोटो व्हायरल
अर्रर्र! नागार्जुनाच्या लेकाला पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, गाडीमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता ‘हे’ कृत्य
ठरलं रे! ‘बिग बॉस मराठी ४’ शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘या’ दिग्गज व्यक्तीच्या खांद्यावर