Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड पॉर्न फिल्म प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, आता शर्लिन चोप्राला अटक…

पॉर्न फिल्म प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, आता शर्लिन चोप्राला अटक…

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राला (Sherlyn Chopra) न्यायालयाने दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे शर्लिनने अटकपूर्व जामीन फेटाळण्याच्या मुबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने या याचिकेवर महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. यावर खंडपीठ म्हणाले, नोटीस बजावली आहे.. दरम्यान, याचिकावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये.

शर्लिनची अटक थांबवली
अभिनेत्री शर्लिनचे वकील सुनील फर्नांडिस यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर आरोपीना आधीच संरक्षण आले आहे. या प्रकरणाशी संबधित एफआयआर मध्ये अभिनेत्री पूनम पांडेसोबत शर्लिनला आरोपी बनविण्यात आले आहे. (supreme court friday granted protection from arrest to actress sherlyn chopra in porn films racket case)

राज कुंद्राच्या अटकेवरही घालण्यात आली बंदी
सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी रोजी पूनम पांडेला अटकेपासून संरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी शर्लिनचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यासोबतच राज कुंद्रालाही डिसेंबरमध्ये अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्यावर महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि त्याच्यावर कथितपणे अश्लील व्हिडिओ बनवण्याचा आणि प्रसारित केल्याचा आरोप होता. अटकेच्या भीतीने राज कुंद्राने स्तर न्यायालयातच जामीन मागितला होता, मात्र त्याची मागणी फेटाळण्यात आली होती. यानंतर राज कुंद्राने उच्च न्यायालयात दावा केला की, आपल्याला या प्रकरणात फसवलं जात आहे.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा