Sunday, June 22, 2025
Home मराठी सुरज चव्हाण मूळगावी रवाना; खंडोबाचे दर्शन घेऊन चरणी ठेवली ट्रॉफी

सुरज चव्हाण मूळगावी रवाना; खंडोबाचे दर्शन घेऊन चरणी ठेवली ट्रॉफी

बिग बॉस मराठी 5ची सांगता झालेली आहे. आणि अखेरीस सुरज चव्हाण (Suraj Chavhan) हा बिग बॉस मराठी 5 चा महाविजेता ठरलेला आहे. बिग बॉस सुरू झाल्यापासूनच सुरज चव्हाण खूप जास्त चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रेम मिळत आहे. तो त्याच्या गावी गेलेला आहे. आणि ट्रॉफी घेऊन सुरज हा थेट जेजुरीच्या गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गेलेला आहे. अशातच सुरजचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्यामध्ये तो ट्रॉफी घेऊन जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेताना दिसत आहे.

सूर्याच्या आजूबाजूला माणसांची खूप जास्त गर्दी दिसत आहेत. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी तसेच व्हिडिओ काढण्यासाठी अनेक लोक गर्दी करताना दिसत आहे. संपूर्ण गडावर येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करताना दिसत आहे. या आधी सूरजने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेतले होते. आणि बाप्पाच्या चरणी ट्रॉफी ठेवली होती. सुरत सध्या गावाकडे गेल्यामुळे गावाकडे देखील त्याची जंगी स्वागत झालेले आहे.

अगदी गावातून दोन शर्ट घेऊन गेलेला हा मुलगा आज लाखो रुपयांचा मालक झालेला आहे. हे सगळे त्याच्या प्रामाणिकपणामुळे तसे साध्या भोळ्या स्वभावामुळे झालेले आहे. त्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे महाराष्ट्राच्या मनात अनेक खास अशी जागा निर्माण केली आहे. प्रत्येकाला तो आवडू लागला. घरात देखील त्याने त्याच्या वागण्यामुळे प्रत्येकाचा आदर केल्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा मिळवला आणि अडचणीत सामना करायला शिकला. सुरजला ट्रॉफी जिंकल्यानंतर 14 लाख 60 हजार रुपये मिळाले. त्यासोबत मानाची ट्रॉफी दहा लाख रुपयांचे गिफ्ट व्हाउचर तसेच इलेक्ट्रिक बाईक मिळालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरांमधून सुरजचे कौतुक केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सिंघम अगेनची भव्य दिव्य कास्ट
बिग बॉस मराठीच्या या विजेत्यांना मिळाले आहेत इतके पैसे; पहा सुरज चव्हाणचा यादीत कितवा नंबर…

हे देखील वाचा