Saturday, March 2, 2024

द्रोणाचार्यांचं पात्र मिळआल्याने भडकला ऍक्टर,निर्मात्याने सुनावल्यावर कोसळले रडु; पाहा पुढे काय झालं

ऍक्टिंगच्या दुनियेत असं अनेकदा होतं की, एखादा ऍक्टर सुरुवातीला एखादी भुमिका करण्यासाठी नकार देतो आणि कालांतराने ते पात्रंच त्याची ओळख बनते. बी.आर चोप्राच्या(B.R.Chopra) महाभारत मालिकेत द्रोणाचार्यांचा रोल करणाऱ्या सुरेंद्र पाल या अभिनेत्यासोबतही असंच झालं. एका इंटरव्यूमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांना सुरुवातीला द्रोणाचार्यांची भुमिका करायची नव्हती. कारण त्यांना हिरो म्हणुन प्रमुख भुमिकेत समोर यायचं होतं.

नाकारला होता द्रोणाचार्यांचा रोल
सुरेंद्र पाल यांनी सुरुवातीला गुरु द्रोणाचार्यांचे पात्र करण्यासाठी नकार दिला होता. त्यांना म्हाताऱ्या व्यक्तीचे पात्र करायचे नव्हते. त्यांचे हे विचार जेव्हा बी.आर चोप्रांना कळले तेव्हा त्यांनी सुरेंद्र पाल यांना खुप सुनावले होते. त्यावेळी त्याना निर्मात्यांसमोरंच रडु कोसळल्याचेही तो म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये ते म्हणाले,”गुफी पेंटलचा मला फोन आला त्यांनी मला सांगितले की,माझ्याकडे तुझ्यासाठी एक रोल आहे. पण जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा सांगितले की, कास्ट फायनल झाली आहे. परंतू महाभारतातील(Mahabharat) गुरु द्रोणाचार्यांची कास्टींग अजुन बाकी आहे. परंतु द्रोणाचार्यांचं नाव ऐकुन मी निराश झालो. ”
ते पुढे त्यांना म्हणाले,”एका म्हाताऱ्या व्यक्तीचा रोल मला दिला जातोय. मी इथं हिरो बनायला आलोय. मी हँडसम दिसतो. मला वाटले माझं ऍक्टिंगचं करियर सुरु होण्याआधीच संपेल. ”

नव्हते करायचे म्हाताऱ्या व्यक्तीचे पात्र
मी गुफी पेंटलला(Gufi Paintal) सरळ सांगितलं की मी म्हाताऱ्या व्यक्तीचे पात्र करु शकत नाही. हे सांगुन मी तिथुन निघालो. मी सेटच्या बोहेर पडणार इतक्यात एक माणुस माझ्या दिशेने धावत आला आणि म्हणाला की तुम्हाला बीआर चोप्रांनी ऑफिसमध्ये बोलावलं आहे.त्या संवादादरम्यान त्यांचं पह्लं वाक्य होतं,’मला माझा द्रोणाचार्य मिळाला ‘. मला त्याच ते बोलणं अजिबात आवडलं नव्हतं.

पडला बाआर चोप्रांचा ओरडा
मी(Surendra Pal) त्यांना म्हणालो,”सर , मला तुम्हाला काही सोंगायचं आहे, मी म्हाताऱ्या व्यक्तीचे पात्र साकारू शकत नाही.” माझं हे बोलणं ऐकुन बीआर चोप्रांना राग आला आणि ते म्हणाले,’तु काय म्हणालास? द्रोणाचार्य म्हातारा माणुस होत? तो एका सैन्याचा जनरल होता.10 अर्जुन आणि 10 दुर्योधन तो बनवु शकत होता. ‘ पुढे ते मला खुप ओरडले , त्यांचं बोलणं ऐकुन मला तिथेच रडु कोसळले.

द्रोणाचार्यांचा रोल करायला राजी झालो सुरेंद्र पाल
गुरु द्रोणाचार्यांचं महत्व सांगितल्यावर बीआर चोप्रांनी मला कनवींन्स करत सांगितलं की, मला एका वाघासारखा लुक हवा आहे, आणि मी माझ्यासमोर एका वाघाला पाहतोय. तुझ्याशिवाय हो रोल कोणीही करु शकत नाही. बीआर चोप्राचं बोलणं ऐकल्यावर सुरेंद्र हा रोल करण्यासाठी तयार झाले. ऑडिशनशिवाय आणि कोणत्याही टेस्ट लुकशिवाय ते या रोलसाठी सिलेक्ट झाले आणि त्यांनी हे पात्र मनापासुन साकारलं याच पात्राने त्यांना फेम मिळवून दिला.

हे देखील वाचा