Wednesday, July 3, 2024

बॉलीवूडच्या तीन ताऱ्यांना मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल

सध्या कोरोना कमी झाला असला तरी पूर्णपणे संपला नाहीये. याच पार्श्वभूमीवर सरकारने अनेक नियम आणि अटी घालून लॉकडाऊन संपवत अनलॉक चालू केले. तरी देखील बऱ्याच ठिकाणी अनलॉकचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. नुकताच सरकारने नाईट कर्फ्यू लागू केला असल्याने रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत जमाव बंदी असणार आहे.

त्यामुळेच अनेक डान्स क्लब, पब, बार यांच्या सुरू राहण्याच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. असे असूनही पब मालक नियम वारंवार तोडत आहे. सोमवारी २१ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातील ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकत ३३ सेलिब्रिटींसह पबच्या सात कर्मचार्‍यांना अटक केली. यात माजी क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, सुझान खान, बादशहा आदी लोकांना अटक झाली आहे.

मुंबई विमानतळाजवळील जेडब्लू मॅरियट हॉटेलच्या ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत अनेक सेलिब्रिटींना अटक केली. या क्लबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी चालू असल्याने पोलिसांनी धाड टाकली. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ पब उघडा ठेवल्यामुळे पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ आणि २६९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली. काही वेळाने अटक करण्यात आलेल्या सेलिब्रिटींना नोटीस बजावत जामिनावर सोडून दिले गेले.

२९ वर्षीय गुरु रंधावा हा गायक, गीतकार व संगीतकार आहे. तरुणांमध्ये गुरुच्या गाण्यांची मोठी क्रेझ आहे. युट्यूबर त्याच्या गाण्यांना जबरदस्त हिट्स मिळतात. पंजाबी व हिंदी गाणी करण्यात तो एक गुरु माहिर संगीतकार समजला जातो. बादशाहला देखील एक चांगला ऱॅपर म्हणून ओळख मिळाली आहे. त्याच्या गाण्यांनाही तुफान हिट्स मिळतात. सुझान खानचा काही वर्षांपुर्वीच बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनबरोबर घटस्फोट झाला आहे.

या अटकेनंतर सुरेश रैनाच्या टीमकडून एका प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात रैनाची बाजू मांडण्यात आली असून रैनाकडून नकळत ही चूक झाल्याचे सांगितले आहे. या पत्रकात लिहले आहे, ‘रैना हा एका शूटिंगच्या निमित्ताने मुंबईत आला असल्याने त्याला मुंबई किंबहुना महाराष्ट्राच्या सध्याच्या कोरोनाच्या अटी आणि नियमांबद्दल कोणतीही माहिती नव्हती. रैनाला त्याच्या मित्राने रात्री जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवणानंतर रैनाला लगेच दिल्लीला निघायचे होते. मुंबईतल्या कोरोनाच्या नियमांबद्दल रैना अनभिज्ञ होता. मात्र जेव्हा रैनाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने पोलिसांना पुर्ण सहकार्य केले. सुरेश रैना हा नेहमी सर्व नियम पाळतो. तो कधीही नियमांचे उल्लंघन करत नाही. त्यांच्याकडून चुकून ह्या नियमाचे उल्लंघन झाले. इथूनपुढे रैना सर्व नियम पाळेल आणि सर्वांना नक्कीच सहकार्य करेल.’

तत्पूर्वी रैनाने ह्याचवर्षी १५ ऑगस्ट २०२० ला क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते.

 

हे देखील वाचा