Monday, February 26, 2024

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

दाक्षिणात्य चित्रपटातील अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता म्हणजे ‘सूर्या’. टॉलिवूडमध्ये सूर्या नावाचे मोठे त्रस्त आहे. त्याला संपूर्ण जगात मोठी फॅन फॉलोविंग असून, त्याचे सर्वच सिनेमे जबरदस्त हिट होतात. त्याचा प्रभावी अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्व नेहमीच त्याला फॅन्समध्ये हिट ठरण्यास मदत करते. ‘उड़ान’, ‘जय भीम’, ‘सिंघम’ आदी अनेक चित्रपटांमुळे तो ओळखला जातो. सध्या तो मात्र त्याच्या सिनेमामुळे नाही तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सूर्याने नुकतेच घर घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)


दाक्षिणात्य स्टार असणाऱ्या सूर्याने मुंबईमध्ये एक आलिशान घर विकत घेतले आहे. या घरात तो त्याची पत्नी ज्योतिका आणि मुलं देव, दिया सोबत राहणार आहे. मुंबईमध्ये त्याने घेतलेल्या घराची किंमत तब्बल ७० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सूर्या आणि ज्योतिकाने मुंबईमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय त्यांच्या मुलांसाठी घेतला असून, त्यांना त्यांच्या मुलांना मुंबईमध्ये वाढवायचे आहे.

दरम्यान ज्योतिका लवकरच एका नवीन हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर ती पुन्हा अभिनय करताना दिसणार आहे. या सिरीजसाठी तिने मोठी रक्कम घेतल्याचे देखील सांगितले जात आहे. सूर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तो शेवटचा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’मध्ये कॅमिओ करताना दिसला होता. सध्या तो दिग्दर्शक सरुथाई शिवा यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा