Monday, July 1, 2024

केतकी माटेगावकर घेऊन येतीये चाहत्यांसाठी सरप्राइझ, पाहा व्हायरल व्हिडिओ

मराठी सिनेसृष्टीतील गायिका आणि लाेकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहात वर्ग आहे. केतकी साेशल मीडियावर कायमच सक्रिय असून चाहत्यांसाेबत तिचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच केतकीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमकं त्या व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया… 

अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका पर्पल रंगाच्या ड्रेस मध्ये एका आलिशान काऊचवर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात पर्पल रंगाची डायरी असून 25 तारखेला काहीतरी येतंय असं ती ह्या व्हिडिओ मध्ये सांगत आहे.

केतकीने हा व्हिडिओ शेअर करताच साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. चाहते या व्हिडिओ संबंधी प्रचंड उत्सुक असून भन्नाट कमेंट करत आहेत.

केतकी माटेगावकर हिच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘सुन्या सुन्या’, ‘प्रियकरा’ तसेच तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केलेलं ‘चांदणे तुझ्यावरीने’ या गाण्याने चाहत्यांचे लक्ष वेधले. केतकीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग असून यूट्यूब चॅनलवर तिचे एक लाखाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. केतकीच्या गाण्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताे. अशातच केतकी काहीतरी नवीनच घेऊन येत असेल असा अंदाज चाहते लावत आहेत, पण नेमके काय येतंय हा प्रश्न तिच्या चाहत्यावर्गाला पडला आहे. केतकी लवकरच एका सिनेमात दिसणार अशी चर्चा होती. पण 25 तारखेला नक्की काय? ह्यासाठी आता तिचे चाहते आतूरतेनं वाट पाहत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोहित रैना अन् अदिती शर्माच्या वैवाहिक आयुष्याला लागणार पुर्णविराम? अभिनेत्याने इंस्टावरुन हटवले फोटो

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील अभिनेत्याचा गंभीर अपघात; पाहा व्हायरल फाेटाे

हे देखील वाचा