Sunday, April 14, 2024

पोषाखकलेत उत्तुंग भरारी! रियॅलिटी शोचा फॅशन डिझायनर म्हणून संदेश नवलखाच्या नावाचा डंका

भारतात फॅशन म्हणजे उच्चभ्रूंचा छंद आणि हौस एवढीच मर्यादित व्याख्या होती मात्र आता फॅशनचा उद्योग म्हणून जन्म झाला आहे असे म्हणायला वावगं ठरणार नाही. फॅशनच्या या उद्योगाला जाग केलंय ते कलाविश्वाने. आज कलाविश्वात वेषभूषाकारांनी खऱ्या अर्थाने ही फॅशन जोपासली आहे. अशाच हिंदी आणि मराठी कलाविश्वात यशस्वी वेशभूषाकार म्हणून संदेश नवलखा याने उत्तम बाजी मारली आहे.

मूळचा पुण्याचा असलेल्या संदेश नवलखा (Sandesh Navlakha) याची फॅशन डिझायनर या क्षेत्रात येणं ही आवड होती. मारवाडी कुटुंबात लहानच मोठं झालेल्या संदेशला वडिलोपार्जित चालत आलेल्या ट्रॅडिशनल व्यवसायात काहीच रस नव्हता. आपली आवड जोपासण्यासाठी त्याने फॅशन डिझायनिंग करण्याचे ठरविले. आई वडिलांच्या आणि पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्याने कलाविश्वात फॅशन डिझायनर म्हणून उडी घेतली. २००७ सालापासून तो या क्षेत्रात कार्यरत आहेत.

रियॅलिटी शो आणि बऱ्याच हिंदी कलाकारांच्या फॅशन डिझायनिंगची धुरा संदेशने पेलवली. होस्ट मनीष पॉल, कोरियोग्राफर टेरेन्स लुईस, गायक जावेद अली यांचे वैयक्तिक फॅशन डिझायनर म्हणून संदेश आजही सिनेविश्वात कार्यरत आहे. बऱ्याचदा कोरियोग्राफर टेरेन्स लुईस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेली संदेशची आणि त्याच्या कामाची, कलेची केलेली स्तुती ही संदेशसाठी त्याच्या कामाची पोचपावती आहे, असे म्हणायला हरकत नाही. कलाविश्वातच नाही तर कॉर्पोरेट लेव्हलच्या बऱ्याच उद्योगपतींसाठीही संदेशने काम केले आहे. इतकेच नव्हे तर हिंदी सोबत संदेश आज मराठी सिनेसृष्टीतही वेळ देत आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या रियॅलिटी शोच्या तीनही पर्वाचे फॅशन डिझायनिंग संदेशने स्वतः केले आहे. सचिन खेडेकर, नागराज मंजुळे यांनी देखील संदेशच्या फॅशन सेन्सचे नेहमीच कौतुक केले. शिवाय झी मराठी वाहिनीवरील ही रियॅलिटी शोचे त्यांने फॅशन डिझायनिंग म्हणून काम पाहिले. तर ‘लव्ह यु लोकतंत्र’ या चित्रटाच्या वेशभूषेची जबाबदारी संदेशने पेलवली.

हेही वाचा- ‘तो बकबास शो…’, ‘कॉफी विथ करण’वर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘माझी सेक्स लाईफ…’

‘Smirnoff International Fashion Award’ या जगभरातल्या फॅशन इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अवॉर्ड शोमध्ये संदेश सेमी फायनॅलिस्ट पर्यंत पोहचला, तर ‘Surydatta Natioanl Award’ मध्ये संदेशचा विशेष सन्मान करून त्याला सन्मानित करण्यात आले. शिवाय झी अवॉर्डने ही त्याला सन्मानित करण्यात आले आहे. स्टायलिंग आणि फॅशनचे धडे देण्यात संदेश पटाईत आहे, मुंबई पुण्यातल्या काही फॅशन इन्स्टिस्ट्युटमध्ये संदेश कर्ताधर्ता म्हणून काम पाहत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जाळ अन् धूर संगटच! प्रसिद्ध अभिनेत्रीचे न्यूड फोटोशूट चर्चेत, उघडं शरीर झाकण्यासाठी घेतला पानांचा आधार
आलिशान आयुष्याला लाथ मारत प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, झोपडीत काढतेय दिवस

हे देखील वाचा