मराठीत वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपट करून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुशांत शेलार. (Sushant Shelar) सुशांत हा एक अभ्यास अभिनेता आहे. यासोबतच राजकारणात देखील सुशांत मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अलीकडेच ज्यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा संबंध जोडला होता. त्याच वेळी सुशांत शेलारने देखील पोस्ट करून संताप व्यक्त केला होता. आणि आता पुन्हा एकदा सुशांत यावर त्याचे मत व्यक्त केलेले आहे. या संपूर्ण प्रकारात प्राजक्ता माळीने तिचे बाजू मांडली. परंतु धनंजय मुंडे काहीच का बोलले नाहीत, याचाही त्यांनी खुलासा केलेला आहे.
नुकतीच माध्यमांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला की, “आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे. त्यापेक्षा एक खूप मोठा विषय मार्गी लागणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्राजक्ता माळीची बाजू आम्ही कलाकार व तिचे सहकलाकार म्हणून घेतली. तसेच बीड मधील संतोष देशमुख यांचा प्रश्न मार्गी लागणे देखील महत्त्वाचे आहे.”
यापुढे तो म्हणाला की, “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न मार्गी लागेल. यामुळे मंत्री महोदय म्हणून धनंजय मुंडे त्या गोष्टी लवकर झाल्या पाहिजेत. याकडे लक्ष देत नाही. आम्ही कलाकार या विषयावर आमचे भूमिका घेत आहोत. त्या देशमुख त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे.”
आमदार सुरेश धस आणि प्राजक्ता यांच्यातील वाद आता मोठा आहे. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबद्दल विवादित वक्तव्य केल्यानंतर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी तिची माफी मागावी अशी मागणी केली होती. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर या प्रकारात प्राजक्ताची माफी मागितली आणि तिने देखील हा विषय संपला आहे. असे जाहीर केले.
अभिनेता सुशांत शेलार हा राजकारणात देखील सक्रिय असतो. काही महिन्यापूर्वी त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच तो एकनाथ शिंदे यांचा प्रचार करताना सुद्धा दिसला आहे. तसेच तो शिवसेनेचा चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रेमाची गोष्ट मालिकेतून तेजश्री प्रधानची एक्झिट; आता ही अभिनेत्री साकारणार मुक्ताची भूमिका
भावासाठी एक चित्रपट केला आणि त्याच चित्रपटाने करियर संपवले; आमीर खानच्या ‘मेला’ला आज २५ वर्षे झाली…