Tuesday, July 9, 2024

सुशांतचे जुने चॅट, इमेल पुन्हा मिळवण्यासाठी सीबीआयने अमेरिकेकडे डेटा रिकव्हरसाठी मागितली मदत

मागच्या वर्षी १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याच्या मृत्यूची चौकशी सुरु झाली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र कुटुंबाची आणि फॅन्सच्या मागणीनुसार सुरूवातील मुंबई पोलीस तपास करत असलेले हे प्रकरण बिहार पोलीस आणि नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले. सुशांतच्या मृत्यूच्या दिड वर्षांनंतरही या त्याच्या मृत्यूचे खरे कारण अजून समोर आले नाहीये. मात्र या प्रकरणात आता एक नवीन अपडेट मिळत आहे.

मिळणाऱ्या माहितीनुसार, सुशांतचे डिलीट झालेले इमेल, सोशल मीडिया अकाउंट वरून डिलीट केलेले मेसेज हा डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सीबीआयने अमेरिकेकडून मदत मागितली आहे. हा डेटा मिळवून सुशांतच्या मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता असल्याने सीबीआयने ही मदत अमेरिकेकडे मागितली आहे. सुशांत सिंगची केस सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने अनेक टेस्ट केल्या, असंख्य लोकांची चौकशी देखील केली. मात्र हाती पक्के असे न आल्याने आता सीबीआयने सुशांतचा डिलीट झालेला डेटा पुन्हा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

Photo Courtesy : Instagram/sushantsinghrajput

कॅलिफोर्नियामध्ये असणाऱ्या गुगल आणि फेसबुककडे MLAT (Mutual Legal Assistance Treaty) च्या अंतर्गत माहिती मागितली आहे. सीबीआयने गुगल आणि फेसबुककडे सुशांतचे डिलीट झालेले चॅट, इमेल आणि पोस्ट आदी अनेक गोष्टींची सविस्तर माहिती देण्याची विनंती केली आहे. भारत आणि अमेरिकेकडे एमएलएटी हा अधिकार असून, या अंतर्गत हे दोन्ही देश कोणत्याही देशांतर्गत बाबतीसाठी माहिती मिळवू शकतात.

एमएलएटीच्या अंतर्गत अशा स्वरूपाची माहिती मिळवणे किंवा दुसऱ्यास देणे यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी असणे अनिवार्य असते. तर अशा पद्धतीची माहिती अमेरिकेत अटॉर्नी जनरलचे ऑफिस देत असते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक प्रकारे त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली. त्याच्या रूममेटपासून ते नोकर, सहकलाकार, गर्लफ्रेंड आदी अनेक लोकांची नावे या यादीत आहेत. मात्र अजूनपर्यंत सुशांतच्या मृत्यूचे खरे आणि ठोस कारण समोर आले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

-काय सांगता! ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमध्ये करायचे नव्हते नवाजुद्दीन सिद्दीकीला काम, स्वत:च सांगितले कारण

हे देखील वाचा