Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

व्हिडिओ: अभिनेत्री सुष्मिताला कथ्थक डान्स शिकताना पाहिलंय का? अजूनही करतेय चाहत्यांना घायाळ

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपल्या सौंदर्याने आणि उत्त्तम अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. पण आता ती या सिनेजगातून बऱ्याच वर्षांपासून दूर आहे. आता ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून ती, तिच्या आयुष्यातील खास क्षण तिच्या चाहत्यांसह शेअर करायला अजिबात विसरत नाही आहे.

त्याचबरोबर तिने नुकताच, आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते एवढे वेडे झाले आहेत की, त्या व्हिडिओवरून त्यांची नजरच हटत नाहीये. यावरून आजही असे दिसते की, सुश्मिता अजूनही तेवढीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करू शकते.

व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, सुष्मिता सेन तिच्या डान्स टिचरकडून गिरी नंदिनी गाण्यावर कथ्थक डान्स स्टेप्स शिकत आहे. सुष्मिता सेनचे डान्स स्टेप्स पाहण्यासारखे आहेत. तिची शैली कौतुकास्पद आहे. व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. याव्यतिरिक्त, ती खुल्या केसात कमालीची दिसत आहे, आणि लाल रंगाची ओढणी तिला अगदी शोभून दिसत आहे.

अभिनेत्री गेल्या काही वर्षात पडद्यापासून दूर आहे, परंतु तिची आकर्षक पोस्ट कायमच तिला चर्चेत आणत असते. सुष्मिता सेनने आर्या वेबसीरिजमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. चाहत्यांसह कलाकारांनीही सुष्मिता सेनच्या अभिनयाचे, आणि थीमचे कौतुक केले आहे.

मागील वर्षी जूनमध्ये रिलीज झालेल्या, या वेब सीरिजला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचवेळी या मालिकेचा दुसरा भागही मार्च २०२१ मध्ये रिलीझ होणार होता, पण कोरोनामुळे या मालिकेची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना संपल्यावर लवकरच, सुष्मिता सेन वेब सीरिजमधून आपल्या भेटीला येईल हे नक्कीच.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, ५ तासातच मिळाले ३६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-उर्वशी रौतेलाच्या अभिनयाला मिळाली गुरु रंधावाच्या सुरांची साथ! गाण्याला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

-मुलगी असावी तर अशी! ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने लावले आईसोबत ठुमके, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा