Tuesday, April 29, 2025
Home बॉलीवूड ललित मोदींसोबतच्या नात्याची पुष्टी केल्यानंतर, सुष्मिता सेनने घेतला मोठा निर्णय, भाऊ राजीव सेनला बसेल धक्का

ललित मोदींसोबतच्या नात्याची पुष्टी केल्यानंतर, सुष्मिता सेनने घेतला मोठा निर्णय, भाऊ राजीव सेनला बसेल धक्का

सुष्मिता सेनचे (Sushmita Sen) कुटुंब या दिवसांत सतत चर्चेत असते. सुष्मिता सेन पुन्हा प्रेमात पडली असतानाच, तिचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा (Charu Asopa) यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. पण चारू अनेकदा तिच्या ब्लॉगमध्ये सांगताना दिसली की, तिची नणंद सुष्मिता तिला नेहमीच सपोर्ट करते. त्याचवेळी आता बातमी येत आहे की, सुष्मिता सेनने ललित मोदींसोबतचे नाते घोषित करून आता एवढा मोठा निर्णय घेतला आहे की, हे जाणून राजीव सेनच्या पायाखालची जमीन सरकेल.

सोशल मीडियावरून केले अनफॉलो
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सुष्मिता सेनने तिचा भाऊ राजीव सेनला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. अभिनेत्रीच्या या पावलामागील कारण म्हणजे चारू असोपा आणि घटस्फोटापर्यंत पोहोचलेले नाते असू शकते. बातम्यांनुसार, सुष्मिता सेनच्या या निर्णयानंतर तर सुष्मिताला तिच्या भावासोबतचे सर्व संबंध संपवायचे आहेत, अशा बातम्याही येत आहेत. (sushmita sen taken biggest decision)

ई-टाइम्सशी बोलताना चारू असोपाने तिची सासू आणि नणंद सुष्मिता सेनची खूप प्रशंसा केली होती. संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आयुष्यात तीन सर्वोत्तम महिला आहेत. माझी आई, सासू आणि नणंद. या तिघांकडून मी नेहमीच काही ना काही शिकत असते. विशेषत: सुष्मिता दीदीकडून, तिने आपल्या दोन मुलींना एकट्याने कसे वाढवले ​​आहे.” एक स्त्री सर्वकाही कशी करू शकते, हे तिने मला पटवून दिले आहे, असेही चारू म्हणाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

 

हे देखील वाचा