Monday, July 1, 2024

सुष्मिता सेनचा डॅशिंग लूक! एका हातामध्ये सिगारेट आणि दुसऱ्यामध्ये बंदुक,पाहिलात का आर्या 3 चा ट्रेलर?

मिस युनिवर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच आपल्या वायक्तीक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिने इंडस्ट्रीमधील अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या दमदार अभिनयचा ठसा उमटवला आहे. आता पुन्हा एकदा सुष्मीता मोठ्या ब्रेकनंतर ‘आर्या 3‘ सिझन तीनच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकतंच आर्या 3  वेबसिरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून लांब होती मात्र, आर्या 3 (Arya 3) या बेबसिरिजच्या तीसऱ्या सिजनमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय तिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन आर्या 3 चा टीझरही शेअर केला आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये सुष्मिता डॅशिंग लूकमध्ये पाहायला मिळाली. 2021 साली प्रदर्शित झालेल्या आर्या 2 मध्ये तिच्या विरोधकांना मारुन मुलांना घेऊन देश सोडून फरार झाल्याचं पाहायाला मिळालं. मात्र, कथा तिथेच संपत नाही तर त्यापैकी अजून एका विरोधकांची एंट्री आर्या 3 मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

आर्य 3 च्या टीझरमध्ये सुष्मिता हातामध्ये सिगारेट घेऊन किलर लूक देताना दिसत आहे. सुष्मिता हा डॅशिंग लूक पाहून चाहत्यांना भुरळ घातली आहे. एका हातामध्ये सिगारेट आणि दुसऱ्या हातामध्ये बंदूक असेलल्या सुष्मिताचा अंदाजच हटके दिसत आहे. हा टीझर शेअर करताना अभिनेत्रीने आर्या 3 ची शुटींग अजून सुरु आहे असंही सांगितलं आहे. लवकरच ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपिल शर्मा कॉमेडीनंतर आता ‘या’ इंडस्ट्रीमध्ये करणार पदार्पण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
इलियाना डिक्रूझ रुग्णालयात दाखल! अभिनेत्रीच्या प्रकृतीसाठी चाहत्यांची प्रार्थना

हे देखील वाचा