Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड ऋतिक रोशनने सोशल मीडियावर शेअर केला स्टायलिश फोटो; हॉटनेस पाहून पहिली पत्नी सुजेन खान म्हणाली…

ऋतिक रोशनने सोशल मीडियावर शेअर केला स्टायलिश फोटो; हॉटनेस पाहून पहिली पत्नी सुजेन खान म्हणाली…

बॉलिवूडमध्ये हिरो कॅटगिरीमधील सर्वात हँडसम अभिनेता कोण? असे जर कोणी विचारले  तर सर्वांच्याच डोक्यात पहिले नाव हे फक्त ऋतिक रोशनचेच येईल. टॉल, डार्क, हँडसम या तिन्ही शब्दांचा खरा अर्थ म्हणजे ऋतिक रोशन. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणारा हा अभिनेता लुक्स आणि फिटनेसच्या बाबतीत आजच्या अभिनेत्यांना तगडी टक्कर देताना दिसतो. दोन मुलांचे वडील असणारा ग्रीक गॉड आजही तरुणींना आपल्या बॉडीने घायाळ करतो.

सोशल मीडियावर ऋतिकने त्याचा टॅन लूकमधला मादक फोटो ‘गुड कॅच’ म्हणत पोस्ट केला आहे. या शर्टलेस फोटोमध्ये ऋतिकने डोळ्यांवर गॉगल, गळ्यात स्कार्फ घातला असून, त्याची फिट बॉडी भल्याभल्यांना घायाळ करत आहे. ऋतिकचा हा फोटो नेटकऱ्यांना आकर्षित करत असून त्यावर कलाकार आणि फॅन्स एक से बढकर एक कमेंट्स करत आहे.

मात्र या सर्व कमेंट्समध्ये एका व्यक्तीच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे आणि ती व्यक्ती आहे ऋतिकची पहिली पत्नी सुजेन खान. हो, सुजेनने ऋतिकच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले, “२१ वर्षाचा दिसत आहेस.” सुजेनच्या या कमेंट्ला अनेकांनी लाईक्स केले आहेत. यासोबतच एव्हरग्रीन अनिल कपूर यांनी देखील ऋतिकच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले की, “तू सतत पातळी वरवर नेत आहेस.” तर टायगर श्रॉफने लिहिले,”बाप”. ऋतिकच्या या फोटोला आतापर्यंत २३ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, तेवढ्याच कमेंट्सही आल्या आहेत. त्याच्या या फोटोवरून लक्षात येते की, तो फिटनेसच्या बाबतीत खूप सजग आहे.

ऋतिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो लवकरच दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ सिनेमात दिसणार आहे. ऋतिकने नुकतेच त्याच्या ‘क्रिश’ सिनेमाला १५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक १५ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि लिहिले होते की, “भूतकाळ तर गेला आता पाहू भविष्यकाळ आपल्यासाठी काय घेऊन येतोय.’  सोबतच असलेल्या व्हिडिओमध्ये ऋतिक क्रिशच्या अवतारात दिसत असून, या वरून फॅन्स ‘क्रिश ४’ सिनेमा येणार असा अंदाज लावत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा