‘…आनंदाचे तळे त्या पल्ल्याड आहेत’, सुव्रत जोशीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला कोकणच्या अप्रतिम सुंदरतेचा नजारा


गेल्या काही दिवसांपासून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सुव्रत जोशी कोकणात त्याचा वेळ घालवत आहेत. कोकणामध्ये त्याच्या गावी तो निसर्गाच्या अप्रतिम सानिध्याचा आनंद लुटताना दिसत आहे. एवढेच नव्हे, तर तिथून त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील तो सोशल मीडियावर शेअर करत आहे, जे चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत आहेत. आता पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.

सुव्रतने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो एका नदीच्या किनारी उभा आहे. सोबतच यात हिरवीगार झाडे, मोठमोठी डोंगरे, निळेशुभ्र आकाश आणि खळखळ वाहणारी नदी पाहायला मिळत आहे. एकंदरीत सुव्रतच्या या व्हिडिओमध्ये निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचे दर्शन घडले आहे. व्हिडिओद्वारे अभिनेता म्हणतोय की, त्याला त्या भिंतीच्या पलीकडे जायचं आहे, कारण तिथे त्याला आनंद मिळणार आहे.

व्हिडिओ शेअर करून सुव्रतने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “शेवटची ती भिंत लांघायची आहे…आनंदाचे तळे त्या पल्ल्याड आहेत.” त्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडल्याचे दिसून येत आहे. कारण या व्हिडिओमुळे त्यांना घरबसल्या कोकणाचे दर्शन झाले आहे. (Suvrat Joshi’s video shows the amazing beauty of Konkan)

सुव्रतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने संजय जाधव दिग्दर्शित ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये ‘सुज्या’ची भूमिका साकारली होती, जी खूप गाजली. या मालिकेने सुव्रतला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. स्वभावाने कडक आणि शिस्तप्रिय असणारा, मात्र मित्रांच्या मदतीला धावून जाणारा सुज्या अर्थातच अभिनेता सुव्रत जोशीची भूमिका अजूनही चाहत्यांना चांगलीच लक्षात आहे. सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असणारा अभिनेता आज काल त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू नेहमीच आठवणीत राहशील…’, म्हणत अंकिता लोखंडेने सुशांतसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

-भारतीय संस्कृतीवरून प्रश्न विचारल्यावर ऐश्वर्या म्हणाली ‘असे’ काही; उत्तर ऐकूण डेव्हिड लेटरमॅनही झाला होता सुन्न

-लय भारी! ‘मस्त चाललंय आमचं’, म्हणत शालूच्या डान्सचा सोशल मीडियावर धुराळा


Leave A Reply

Your email address will not be published.