मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ या अर्थातच स्वप्नील जोशी चाहत्यांच्या लाडका अभिनेता आहे. चित्रपटातील त्याची प्रत्येक भूमिका रसिकांकडून खूप पसंत केली जाते. मराठी चित्रपट व रंगमंचावरून काम केल्यानंतर, त्याने हिंदी चित्रपटातही काम करून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच आता त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एन्ट्री मारलेली पाहायला मिळत आहे.
अभिनय क्षेत्राप्रमाणे स्वप्नील सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केले जातात. अशातच त्याने एक पोस्ट केली आहे, जिला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्याने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं चेक्सचं शर्ट घातलं आहे आणि सोबतच हातात घड्याळ घातली आहे. यात तो बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असे लक्षात येईल की, तो कोणाच्या तरी विचारात हरवला आहे. यातील त्याची स्माईल अगदी पाहण्यासारखी आहे.
फोटोसोबतच याचं लक्षवेधी कॅप्शनही चाहत्यांमध्ये चर्चा रंगवू लागलं आहे. हा फोटो शेअर करत, स्वप्नील म्हणतोय की, “मनमोहिनी आज पाहिली, छबी तिची पाहता या मनी राहिली…!” हे कॅप्शनही चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसून येत आहे. चाहते फोटोवर कमेंट करून त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आजवर अनेक चित्रपटात वाखण्याजोग्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच रिलीझ झालेली त्याची ‘समांतर २’ ही वेब सिरीज चांगलीच गाजत आहे. या वेब सिरीजने अनेक विक्रम मोडीस काढत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. यात अभिनेत्यासोबत तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-5जी प्रकरण: जुही चावलाने हायकोर्टातून मागे घेतली याचिका, कोर्टाने ठोठावला होता २० लाखांचा दंड