Sunday, January 12, 2025
Home मराठी स्वप्नील जोशीने सांगितला दुनियादारी सिनेमाचा अनुभव; म्हणाला, ‘सिनेमा बंद पडला असता…’

स्वप्नील जोशीने सांगितला दुनियादारी सिनेमाचा अनुभव; म्हणाला, ‘सिनेमा बंद पडला असता…’

मराठी अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याला सर्वत्र चॉकलेट बॉय म्हणून ओळख आहे. त्याचे सगळे सिनेमे प्रेक्षकांना खूप आवडतात परंतु 2013 साली आलेला दुनियादारी हा सिनेमा खास आवडला. आजही या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळते. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या सिनेमात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे वर्षा उसगावकर यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जवळपास 12 वर्षांनी स्वप्नील जोशी याने या चित्रपटात श्रेयसची भूमिका निभावताना त्याला कोणत्या अडचणी आल्या होत्या? याचा खुलासा केलेला आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्वप्निल जोशींनी सांगितले की, “दुनियादारी करताना अनेक अडचणी आल्या. आपल्या सगळ्यांचा अत्यंत लाडका अभिनेता आनंद अभ्यंकर तो दुनियादारीच्या शिफ्ट मधून निघाला. आणि तो गेला. त्यानंतर टेक्निकली आम्ही सिनेमा बंद केला होता. एक धडधाकट माणूस गेला अत्यंत लाडका नट आणि मित्र गेला. तो माझ्या एवढा जवळचा मित्र नव्हता. परंतु संजय जाधवचा अत्यंत लाडका मित्र होता. त्यामुळे आमचा पिक्चर बंद पडला होता. असा अनेक अडचणी सांगू शकतो.”

पुढे स्वप्निल म्हणाला की, “प्रत्येक अडचणीवर काही ना काही तोडगा नाईट गेला. खात्री होती की, या चित्रपटात काहीतरी वेगळं घडतंय. आम्ही नेहमीच असं म्हणतो की, शिरवळकर वरून बघत होते. सिनेमा बनताना दुनियादारीचे ते लेखक होते. शिरवळकर वरून आशीर्वाद देत होते. आम्हाला जे त्यांना आवडत होते. ते ओके करत होते. आणि त्यांना जे आवडत नव्हते, त्यात विघ्न आणून ते बंद करायला लावत होते.

अशाप्रकारे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच अत्यंत मोठ्या कलाकाराचे निधन झाल्याने त्यांच्या शूटिंग दरम्यान अनेक अडचणी आल्या, याबद्दल स्वप्निल जोशी याने मुलाखतीत व्यक्त केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

कपाळी टिकली आणि केसात गजरा; सायली संजीवच्या सौंदर्याने चाहत्यांना पडली भुरळ
अभिनेते होते दिग्दर्शक झाले; यांनी बदलला मार्ग आणि करियरने घेतले वेगळे वळण…

हे देखील वाचा