Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड लज्जास्पद! नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणावर स्वरा भास्करचे ट्वीट; म्हणाली ‘कधी थांबणार हे?’

लज्जास्पद! नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणावर स्वरा भास्करचे ट्वीट; म्हणाली ‘कधी थांबणार हे?’

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या सशक्त अभिनयासाठी ओळखली जाते. सोबतच ती तिच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे, विवादित वक्तव्यांमुळे देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या स्वराच्या अशा बेधडक मतं मांडण्यामुळे अनेकदा वाद देखील निर्माण झाले आहेत. शिवाय तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. मात्र स्वरा तिचे मत मांडणे थांबवत नाही. यामुळे ती नेहमीच प्रकाशझोतात असते.

नुकतेच स्वराने एक ट्वीट केले आहे. दिल्लीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारांबद्दल, तिने हे ट्वीट केले आहे. दिल्लीमध्ये नुकतेच एका नऊ वर्षाच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली. या केसमध्ये पोलिसांनी एका पुजाऱ्यासोबतच चार लोकांना अटक केली आहे.

या घटनेचा बहिष्कार करत स्वराने ट्वीटमध्ये लिहिले, “लज्जास्पद, महिला आणि मुलींवर होणारे हे असे अत्याचार नक्की कधी थांबणार आहे?” तिच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एकाने लिहिले, “आता भक्त येतील आणि एका बलात्काराची तुलना दुसऱ्यासोबत करायला लागतील.” अजून एकाने लिहिले, “लखनऊच्या मुलीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे?”

एका वृत्तानुसार दिल्लीमध्ये नाबालिक मुलीच्या मृत्यूच्या केसची दिल्ली पोलीस चौकशी करत होते. या तपासात पोलिसांनी त्या मुलीवर बलात्कार, तिची हत्या आणि अंतिम संस्कार करण्याच्या आरोपाखाली चार आरोपींना अटक केली आहे. या चार लोकांनी त्या मुलीच्या आई वडिलांनाच्या परवानगीशिवाय आणि पोलिसांना न कळवता परस्पर अंतिम संस्कार केले. त्यानंतर पीडित कुटुंबाने स्थानिक लोकांच्या साथीने विरोध प्रदर्शन केले. यात काही स्थानिक नेता देखील सामील होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा