Tuesday, March 5, 2024

राहुल गांधींची संसद सदस्यता रद्द झाल्यानंतर स्वरा भास्करने ट्विट करत दिला त्यांना पाठिंबा

काँग्रेसचे दिग्गज नेता राहुल गांधी हे सध्या खूपच चर्चेत आहे. सतत ते मीडियामध्ये लाइमलाईट्मधे येत आहेत. २४ मार्च रोजी लोकसभेच्या सचिवालयाच्या आदेशावरून संसदेतील राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. यावरून राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत असून बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांनी या गोष्टीवर तात्यांचे मत नोंदवले आहेत. यातच स्वरा भास्कर देखील समावेश आहे. स्वराने यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत व्यक्त केले आहे.

संसदेतील सदस्यता रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विट करत लिहिले, “मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि मी कितीही किंमत चुकवण्यास तयार आहे.” राहुल गांधींच्या या ट्विटला स्वरा भास्करने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रिट्विट केले आहे. सोबतच तिने एका ट्विटमध्ये लिहिले, “हॅलो जग, लोकशाहीची आई आपल्याच मुलाला मारत आहे.” तिने तिच्या अजून एका ट्विटमधून राहुल गांधी यांच्या सदस्यता रद्द होण्यावर कायद्याचा दुरुपयोग केल्याचे म्हटले आहे. या ट्विटवरून हे स्पष्ट लक्षात येते की ती राहुल गांधींच्या बाजूने मैदानात उतरली आहे. स्वराच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राहुल गांधींच्या बाजूने ट्विट केल्यानंतर स्वराला अनेकांनी पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी ट्रोल केले आहे. एकाने लिहिले, “हॅल्लो तर अशी म्हणते की सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखते.” एकाने लिहिले, “काद्यानुसार काम करणे लोकशाहीच्या विरोधात आहे.” आता स्वरा काय ट्विट करते आणि कोणाला काय उत्तरं देते हे पाहणे महत्वाचे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा