Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड व्हायरल होतोय पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा धमाकेदार डान्स; व्हिडिओ पाहून स्वरा भास्करने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

व्हायरल होतोय पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा धमाकेदार डान्स; व्हिडिओ पाहून स्वरा भास्करने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही इंडस्ट्रीमधील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाती. वेगवेगळ्या आणि वाखण्याजोग्या भूमिका साकारून स्वराने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. शिवाय अभिनेत्री आपल्या निर्भीड मतांसाठीही ओळखली जाते. तिला समाजातील अनेक मुद्द्यांवर अगदी बिनधास्तपणे बोलताना पाहिलं गेलं आहे.

दरम्यान पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री स्टेजवर धमाकेदार अंदाजात भांगडा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ स्वतः चरणजीत सिंग चन्नी यांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आता स्वरा भास्करनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे. हा व्हिडिओ कपूरथला येथील एका कार्यक्रमाचा आहे. (swara bhasker twitter reaction on punjab cm charanjit singh channi bhangra video)

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा भांगडा व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले की, “गोड.” यासोबत तिने काही इमोजी देखील पोस्ट केले आहेत. स्वरा भास्करच्या या ट्वीटवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. प्रथम हा व्हिडिओ मुख्यमंत्री कार्यालयाने शेअर केला होता आणि त्यावर लिहिले होते, “मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी गुजराल पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी, कपूरथलाच्या विद्यार्थ्यांसोबत भांगडा एन्जॉय करत आहेत.”

चरणजीत सिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते यापूर्वी अमरिंदर सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होते. ते पंजाबमधील पहिले दलित नेते आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री बनले. चरणजीत सिंग चन्नी हे चमकौर साहिब मतदारसंघातून तीन वेळा आमदार ठरले आहेत. रविवारी त्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. चन्नी पंजाब विधानसभेत २०१५ ते २०१६ पर्यंत विरोधी पक्षनेतेही होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा