Monday, July 1, 2024

‘मी सिरीयसली घेतलं तर अवघड होईल!’, ‘या’ अभिनेत्रीने कंगनाला दिलाय कडक इशारा

आपल्या दमदार अभिनयामुळे दक्षिण आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारी तापसी पन्नू (Taapsee Pannu) जगभरात लोकप्रिय आहे. तापसीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केले आहेत. इतकंच नाही, तर ‘पिंक’ आणि ‘थप्पड’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन या अभिनेत्रीने सिद्ध केले आहे की, तिचे चित्रपट हिट करण्यासाठी तिला कोणत्याही अभिनेत्याची गरज नाही. आता लवकरच ती ‘शाबाश मिठू’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटांप्रमाणेच तापसी तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना तापसीने कंगना रणौतवर (Kangana Ranaut) निशाणा साधला आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना अनेक अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले होते. यावेळी बोलताना तिने कंगना रणौतवर नाव न घेता टीका केली. यावेळी तिच्या कारकिर्दीबद्दल बोलताना तापसी पन्नू म्हणाली की, ती कधीही सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रीच्या शर्यतीत उतरत नाही. कारण तिच्या गरजा पूर्णपणे मध्यमवर्गीय आहेत. तापसीला ए प्लस, बी प्लस, सी प्लस सुद्धा सुरक्षा नाही. तापसी म्हणाली की, “माझ्याकडे बॉडीगार्डही नाही, कारण मी माझ्या शरीराची काळजी स्वतः घेऊ शकते.” यादरम्यान तापसीने कंगनावर निशाणा साधला आणि म्हणाली की, “ती माझ्याबद्दल बोलते कारण ती माझ्यावर खूप प्रेम करते.” तापसीने स्वतःची आणि कंगनाची तुलना केली आणि सांगितले, “आम्ही दोघीही प्रत्येक गोष्टीत वेगळे आहोत, परंतु कदाचित कुरळे केस आहेत म्हणून आम्ही सारखे वाटतो.”

यावेळी कंगनाचे नाव न घेता, तापसी म्हणाली की, “तिच्या कमेंट्सने मला आधी दुखावले होते, कारण मला असे वाटायचे की ती देखील चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर माझ्या बाजूने नाही. माझ्या मेहनतीच्या जोरावर जेव्हा मी इथपर्यंत पोहोचले तेव्हा मला वाटायचं आपणही असंच काहीतरी करायला हवं. पण जेव्हा तुम्ही अशा वागण्याची अपेक्षा कोणाकडूनही ठेवायची नाही. त्यामुळे विचित्र वाटतं.”  तापसी पुढे म्हणाली की, “मला वाईट वाटले नाही कारण ती माझ्याबद्दल अशा कमेंट करते, मला वाईट वाटले कारण तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करता त्याने अशी प्रतिक्रिया द्यायला हवी.” तापसी म्हणाली की, ती स्वतःला कधीच सिरीयल घेत नाही. कारण तिने असे केले तर कठीण होईल. या उद्योगात टिकून राहा कारण येथे दररोज घडणाऱ्या गोष्टींसाठी हा सिद्धांत खरा आहे की, स्वतःला गांभीर्याने घेऊ नका. असा संदेशही तिने यावेळी दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा