Wednesday, June 26, 2024

Taapsee Pannu: बॉलिवूडमध्ये पुन्हा वाजणार सनई चौघडे; लवकरच तापसी पन्नू अडकणार विवाहबंधनात

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नसोहळ्याचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी, अभिनेता अमिर खान याच्या मुलीचं लग्न पार पडलं तर नुकतंच अभिनेत्री रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी विवाहबंधनात अडकले. यांच्या लग्नाची चर्चा सुरु असताना आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री प्रियकरासोबत सातफेरे घेणार आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा सनई चौघडे वाजणार आहेत.(Taapsee Pannu to marry longtime boyfriend Mathias Boe )

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) लग्नाच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. लवकरच तापसी तिचा प्रियकर आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो(Mathias Boe) याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. याचवर्षी मार्चमध्ये त्यांचा विवाह सोहळा आयोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या १० वर्षापासून तापसी भारतीय बॅडमिंटन कोच मॅथियास बो सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चच्या अखेरीस दोघे उदयपुर येथे शीख आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्नबेडीत अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप दोघांनी कोणतीही माहिती अधिकृत जाहिर केलेली नाही.

तापसीने नुकताच तिचा आनंद व्यक्त केला होता आणि तिच्या नात्याबद्दल माहितीही शेअर केली होती. राज शामानी यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान तापसीने मॅथियास बोची भेट कशी झाली याचा खुलासा केला. २०१३ मध्ये जेव्हा तिने “चश्मे बद्दूर” चित्रपटातून बी टाऊनमध्ये पदार्पण केले. तेव्हा तिची मॅथियासशी भेट झाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mathias Boe (@mathias.boe)

नात्याबद्दल बोलताना, “मी तेव्हापासून एकाच व्यक्तीसोबत आहे आणि मला त्याला सोडण्याचा किंवा दुसऱ्यासोबत राहण्याचा कोणताही विचार नाही कारण मी या नात्यात खूप आनंदी आहे.” अशी तापसीने कबुली दिली होती.

तापसी पन्नूच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शाहरुख खानसोबत चित्रपट ‘डंकी’ मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता तापसी अर्शद सय्यद लिखित आणि दिग्दर्शित ‘वो लड़की है कहाँ’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रतीक बब्बर आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

तापसीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर. ती ‘हसीन दिलरुबा’ चा बहुप्रतिक्षित सिक्वेल फिर आई हसीन दिलरुबा’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तापसी विक्रांत मॅसी, सनी कौशल आणि जिमी शेरगिलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हे देखील वाचा