Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

धक्कादायक! ‘तारक मेहता…’च्या ‘या’ कलाकाराच्या मृत्यूची अफवा, अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल

सिने जगतातील कलाकार आणि त्यांच्याबद्दलच्या येणाऱ्या वेग-वेगळ्या अफवा ही प्रकरणे काही नवीन नाहीत. कुणाचे लग्न झाल्याची अफवा नेहमीच कानावर येत असते. पण जर एखाद्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची अफवा आली, तर किती गोंधळ उडेल. हे काही वेगळ सांगायला नको. असाच प्रसंग ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील एका कलाकारावर आल्याची माहिती समोर आली आहे. तारक मेहता मधील आत्माराम तुकाराम भिडेच्या मृत्यूची अफवा समोर आल्याने, त्या अभिनेत्याचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कॉमेडी टीव्ही शोमधील ‘आत्माराम तुकाराम भिडे’ची भूमिका साकारणारे अभिनेता मंदार चांदवडकर यांना (Mandar Chandwadkar) त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या आल्याने लगेचच लाईव्ह यावे लागले. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना लाईव्ह येऊन ते पूर्णपणे ठीक आहेत, निरोगी आहेत आणि सोशल मीडियावर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले.

मंदार त्यांच्या लाइव्ह व्हिडिओमध्ये म्हणाले की, “नमस्ते, तुम्ही सगळे कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले करत आहात. मी पण कामावर आहे. एका व्यक्तीने काही बातम्या फॉरवर्ड केल्या आहेत, म्हणून मला वाटले की इतरांनी काळजी करू नये, म्हणून मी ताबडतोब लाइव्ह आलो आहे. कारण सोशल मीडिया आगीपेक्षा वेगवान आहे. म्हणून मला खात्री द्यायची आहे की, मी चांगला आहे, शूटिंग करत आहे. त्याचा आनंद घेत आहे.”

मंदारने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, “ज्याने ही घटना घडवली आहे, कृपया अशा अफवा पसरवू नका अशी विनंती करा. देव त्याला सद्बुद्धी देवो. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे सर्व कलाकार पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहेत. भविष्यात खूप काम करण्याची त्यांची योजना आहे. आम्ही सर्वजण आणखी अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन करत राहू. पुन्हा विनंती करतो की, कृपया अशा अफवा पसरवू नका. धन्यवाद.”

दरम्यान मंदार चांदवडकर यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करून १३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिव्यांका त्रिपाठी, मुकेश खन्ना, श्वेता तिवारी, शिवाजी साटम असे इतर कलाकारही अशाच फसवणुकीला बळी पडले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा