Tuesday, April 16, 2024

मीकाच्या स्वयंवरमध्ये कपिल शर्माने केली धमाल, मजेशीर व्हिडिओ केला शेअर

गायक मिका सिंग लवकरच टेलिव्हिजनविश्वात एक नवीन शो घेऊन येत आहे. मिका रियॅलिटी शोच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या माध्यमातून तो त्याच्यासाठी वधूचा शोध घेणार आहे. ‘स्वयंवर-मीका दी वोट्टी’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मीकाच्या आधी राहुल महाजन, राखी सावंत आणि रत्न राजपूत यांनी स्वतःचे स्वयंवर केले. मीकाच्या या स्वयंवरमध्ये सामील होण्यासाठी कॉमेडियन कपिल शर्मा देखील जोधपूरला पोहचला आहे. कपिल जोधपुरवरून परतला असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल आणि मिका एकत्र डान्स करताना दिसत आहे.

कपिल शर्माने अजून एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या जोधपूर ट्रीपची झलक सर्वांना दाखवली आहे. व्हिडिओमध्ये मिका कपिलचे स्वागत करताना दिसत असून, कपिलसोबत दलेर मेहेंदी देखील दिसत आहे. दलेर मेहेंदी आणि मिका एकत्र परफॉर्म करत असून कपिल त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करताना दिसत आहे. कपिलने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “मिका पाजी तुमच्या प्रेमासाठी आणि हॉस्पिटॅलिटीसाठी खूप धन्यवाद. तुमच्या स्वयंवरमध्ये खूप चांगला काळ गेला. वहिनीला बघण्यासाठी खूपच उत्सुक आहे. शुभेच्छा. लव यू. मीका दी वोट्टी”

तत्पूर्वी मिका सिंगने नुकताच सोशल मीडियावर त्याच्या स्वयंवराचे एक गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यात तो त्याची आवड निवड सांगत आहे. या गाण्यात मिका एका पंजाबी नवरदेवाच्या वेशभूषेत दिसत असून, पंजाबी भाषेतील या गाण्यात तो सांगत आहे की, तो भारतात एक वधू शोधत आहे. मिकांसोबत या गाण्यात बंगाली, मराठी आणि राजपूता आदी मुली वधूच्या वेशात दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा