‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांच्या मुलीचे नुकतेच लग्न संपन्न झाले. या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये दिलीप जोशी सर्वात आनंदी आणि सर्वात जास्त एन्जॉय करताना दिसले. दिलीप जोशी यांच्या मुलीच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व व्हिडिओंमध्ये एक गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवली की, दिलीप जोशी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात जेवढी मजामस्ती केली, तेवढाच त्यांच्यात असणारा भावुक पिता देखील सर्वांनी पाहिला. सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नातील दिलीपजींचा एक वेगळा आणि अनसीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेठालाल मुलीच्या लग्नात नाचले जबरदस्त
आता दिलीप (Dilip Joshi) यांचा त्यांच्या मुलीच्या लग्नात सर्वांसमोर दमदार डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला असून, यामध्ये दिलीप त्यांच्या पत्नीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिलीप जोशी त्यांच्या डान्सने सर्वांचेच मनं जिंकून घेत आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या डान्सवर कमेंट करत दिलीप जोशी आणि यांच्या कुटुंबासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत.
आपल्या मुलीच्या जाण्याने दिलीप झाले भावूक
काही दिवसांपूर्वी दिलीप जोशी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचे फोटो त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या मोठ्या प्रसंगी भावूक झालेल्या दिलीप जोशी यांनी लिहिले, “तुम्ही गाणी आणि चित्रपटांमधून भावना उधार घेऊ शकता, परंतु जेव्हा हे सर्व तुमच्यासोबत पहिल्यांदा घडते… तो अनुभव अतुलनीय आहे.” त्यांनी त्यांच्या जावयाचे यशवर्धनचे कुटुंबात स्वागत केले आणि चाहत्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आभार मानले.
लिहिली भावनिक नोट
ते पुढे म्हणाले की, “माझी लहान मुलगी नियती आणि कुटुंबातील सर्वात नवीन सदस्य, माझा मुलगा यशोवर्धन, तुम्हाला या अद्भुत प्रवासासाठी शुभेच्छा! आमच्यासोबत राहून आमचा आनंद वाटून घेणार्या प्रत्येकाचे आभार जे या जोडप्याला त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठवत आहेत. जय स्वामीनारायण.”
जेठालाल यांचा कोण आहे जावई
यशोवर्धन आणि नियती दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. दोघेही कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. दिलीप जोशी यांचे जावई यशोवर्धन मिश्रा हा बॉलिवूड चित्रपटांतील कथा लेखक आणि गीतकार अशोक मिश्रा यांचे पुत्र आहेत. यशोवर्धन आणि नियती यांनी ८ डिसेंबरला विवाह केला. त्याचवेळी, ११ डिसेंबरला लग्नानंतर मुंबईत एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक टीव्ही दिग्गज पोहोचले होते.
हेही वाचा-
- प्रभास आणि पूजा हेगडे अभिनित ‘राधे श्याम’ सिनेमाच्या ट्रेलरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, सस्पेन्स कायम
- जेमी लिव्हरने केली राखी सावंतची ‘अशी’ नक्कल, व्हिडिओ पाहून खुद्द ‘ड्रामा क्वीन’ही झाली लोटपोट
- साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ओपनिंगमध्येच उडवला धुरळा, ‘थालापती’ विजयच्या ‘मास्टर’चाही समावेश