‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या तुफान गाजलेल्या आणि गाजत असणाऱ्या मालिकेतून संपूर्ण जगात प्रसिद्ध झालेले आणि नवीन ओळख निर्माण केलेले अभिनेते म्हणजे दिलीप जोशी. जेठालाल गडा या नावाने त्यांना ओळखले जाते. त्यांचा अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग आदी अनेक कौशल्यांमुळे आज दिलीप जोशी यांनी मनोरन्जनविश्वात मोठ्या मेहनतीने आपले स्थान निर्माण करत ते अढळ केले आहे. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वानाच दिलीप जोशी ज्ञात आहेत. आज जरी त्यांना देशपरदेशात ओळखले जाते, मात्र त्यांच्यासाठी हा मार्ग अजिबातच सोपा नव्हता. अतिशय मेहनतीने आणि कष्टाने त्याने यश संपादन केले आहे.
दिलीप यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये काम केले. सोबतच त्यांनी चित्रपटात काम करणे देखील सुरु केले. मैने प्यार किया, हम आपके है कौन? आदी अनेक चित्रपटांमध्ये त्याची लहान लहान भूमिका केल्या. हम आपके हैं कौन सिनेमात ‘दुष्यंत’ ही भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी आणि लक्षात राहणारी ठरली. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी या सिनेमाबद्दल सांगितले.
दिलीप यांनी सांगितले की, “‘हम आपके है कौन’ हा चित्रपट मी केला आणि तो सुपरहिट झाला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर मला वाटले की, आता माझ्याकडे कामाची कमी कधीच भासणार नाही. आता मला भरपूर काम मिळेल. मी या आनंदात होतो, मात्र असे काही झाले नाही आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बराच काळ मला कामाची कोणतीही ऑफर मिळाली नाही.”
दिलीप जोशी याना त्याच दरम्यान पैशाची खूप गरज होती. याबद्दल ते पुढे म्हणाले, “जेव्हा मला ‘हम आपके है कौन’ची ऑफर मिळाली होती तेव्हा मला पैशांची प्रचंड गरज होती. 1992 साली माझी मुलगी नियतीचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या बँक खात्यात फक्त 25 हजार रुपये होते. त्यापैकी 13-14 हजार रुपये हॉस्पिटलचं बिल भागविण्यात गेले. मी त्यावेळी एकच नाटक करत होतो. ज्याच्या एका शोमधून मला 400 ते 450 रुपये मिळायचे.” पुढे हम आपके कौन नंतर दिलीप यांना बऱ्याच काळाने शाहरुखसोबत ‘1 टु का 4’ चित्रपटात काम मिळाले होते.
तारक मेहता का उलट चष्मा या मालिकेने तर त्यांचे जीवनच बदलून टाकले. त्यांना या मालिकेने अमाप फॅन्स सोबतच नाव, आणि प्रसिद्धी देखील मिळवून दिली.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागिनसारखं डाेलत उर्फीने केला डान्स; युजर्स म्हणाले, ‘आ गई जंगली कहीं की…’
तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट