‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


टेलिव्हिजन दुनियेतील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा.’ मालिकेने गेल्या १२ वर्षात यशाचे शिखर गाठले आहे. प्रेक्षकांना ही मालिका खास पसंतीस पडते. यातील पात्रं देखील प्रेक्षकांना खूप आवडतात. यातील दया बेन हे पात्र सर्वांना खूप आवडते. आज ती या मलिकेपासून लांब आहे, पण आजही तिचे दया बेन हे पात्र सर्वांना खूप आवडते. तिच्या चाहत्यांना अशी आशा आहे की, ती या मालिकेत लवकरच पुन्हा एकदा दिसेल. अशातच दिशा वकानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक डान्स व्हिडिओ आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत गुजराती सुनेचे पात्र निभावणारी दया बेन आता गरबा खेळताना दिसत नाहीये. तर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती कोळी डान्स करताना दिसत आहे. दिशा वकानीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांनी पहिल्यांदाच पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये दिशा ‘दर्या किनारी एक बंगलो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने खूपच धमाकेदार पद्धतीने डान्स केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिशाने गोल्डन स्कर्ट आणि बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. दिशाचा हा कोळी डान्स व्हिडिओ खूप जुना आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आलेल्या या व्हिडिओमध्ये दिशा वकानीचा वेगळाच अंदाज दिसत आहे. दिशा या गाण्यात चोराचे पात्र निभावताना दिसली आहे. जी पोलिसांचेच पाकीट मारते. यांनतर ‘दर्या किनारे एक बंगलो’ हे गाणे सुरू होते. (Taarak Mehta ka ooltah chashma fame Daya Ben’s dance video viral on social media)

दिशाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चकित झाले आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “जेठालालला सांगू का?” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “दिशाला अशा अंदाजात पाहायला मिळेल असा आम्ही कधी विचार देखील केला नव्हता.” दिशाने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून मॅटरनिटी लिव्ह घेतली आहे. पण ती अजूनही या मालिकेत परत आली नाही. तिचे चाहते तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू नेहमीच आठवणीत राहशील…’, म्हणत अंकिता लोखंडेने सुशांतसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

-भारतीय संस्कृतीवरून प्रश्न विचारल्यावर ऐश्वर्या म्हणाली ‘असे’ काही; उत्तर ऐकूण डेव्हिड लेटरमॅनही झाला होता सुन्न

-लय भारी! ‘मस्त चाललंय आमचं’, म्हणत शालूच्या डान्सचा सोशल मीडियावर धुराळा


Leave A Reply

Your email address will not be published.