Monday, April 15, 2024

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा निर्माता असित मोदीविरोधात एफआयआर दाखल, लवकरच होणार अटक?

तारक मेहता का उल्टा चष्मा‘चा निर्माता असित मोदी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात जेनिफरने निर्माता असित मोदी आणि शोशी संबंधित इतर दोन लोकांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता आणि पोलिसात तक्रार दाखल केली. अशात याप्रकरणी पोलीस बराच काळ तपास करत होते. मात्र, आता सोमवारी (19 जुन)ला मुंबई पोलिसांनी लैंगिक छळ प्रकरणी निर्माता असित मोदीसह तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे.

अभिनेत्री जेनिफर मिस्त्री (Jennifer Mistry Bansiwal) हिने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी असित मोदी (asit modi) तसेच ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, असित मोदी तसेच सोहेल आणि जतीन यांच्याविरुद्ध कलम 354 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

गेल्या महिन्यात पवई पोलिसांनी लैंगिक छळ प्रकरणी असित मोदी आणि दोन लोकांविरुद्ध अभिनेत्रीचे जबाब नोंदवले होते. पवई पोलिसांनी सांगितले की, ‘अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर त्यांनी असित मोदी आणि सोहेल रमाणी यांनाही या प्रकरणी त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स पाठवले होते.’ मात्र, असित मोदी यांनी अभिनेत्रीने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये सांगितले हाेते की, “आम्ही तिच्यावर कायदेशीर कारवाई करू. ती आमची आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, तिचा आमच्यासोबतचा करार संपला आहे. म्हणूनच ती आमच्यावर असे बिनबुडाचे आरोप करत आहेत.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मिसेस सोधीची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, ‘शोचा निर्माता असित मोदी अनेक वर्षांपासून तिचा लैंगिक छळ करत आहे, पण नोकरी जाण्याच्या भीतीने ती गप्प बसली हाेती.’

असित मोदींनी हात जोडून माफी मागावी, असेही अभिनेत्रीचे म्हणणे आहे. तिच्याशिवाय शोमध्ये रीटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या मौनिका भदोरियानेही निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत.( taarak mehta ka ooltah chashmah after mrs sodhi complaint mumbai police filed fir against producer asit modi)

अधिक वाचा-
घटस्फोटानंतर चारू असोपा अन् राजीव सेन पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्याने केला माेठा खुलासा
‘जी कर्दा’मध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल अभिनेत्रीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘लोकांना आवडो वा न आवडो…’

हे देखील वाचा