Tuesday, April 23, 2024

‘जी कर्दा’मध्ये इंटिमेट सीन दिल्याबद्दल अभिनेत्रीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘लोकांना आवडो वा न आवडो…’

बाहुबली‘ फेम तमन्ना भाटिया तिच्या व्यक्तिक आयुष्याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जी कर्दा‘ या वेब सीरिजमुळेही चर्चेत आहे. खरं तर, या वेब सीरिजसाठी तमन्नाने तिचा 18 वर्ष जुना नियम मोडला आहे आणि या वेब सीरिजमध्ये तिचा सहकलाकार साहेल नय्यरसोबत खूप इंटिमेट सीन्स दिले आहेत. मंडळी, तमन्ना भाटियाने तिच्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी इंटीमेट सीन देण्याची ही पहिलीच वेळ आहे, याआधी ती नो किसिंग पॉलिसी फॉलो करत होती. दरम्यान तिला लाेकांच्या टिकेला सामाेरे जावे लागत आहे.

तमन्ना भाटिया (tamannaah bhatia) हिने तिची नो-किसिंग पॉलिसी मोडून इंटीमेट सीन्स देण्याबाबत माध्यमांशी केलेल्या संभाषणात आपले मत व्यक्त केल आहे. तमन्ना म्हणाली, “या लोकांचा प्रवास सांगण्यासाठी हे सीन खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप ड्रामा दाखवता, तेव्हा त्यातला हा एक महत्त्वाचा पैलू असतो, कारण ते सत्य आहे.”

तमन्ना पुढे म्हणाली, “लोकांना आवडो वा न आवडो, हे असेच असते. सुहेलने हा सीन माझ्यासाठी कम्फर्टेबल बनवला. लावण्या आणि ऋषभच्या व्यक्तिरेखेत तल्लीन होण्यासाठी मला आणि सुहेलला कोणताही अडथळा नव्हता. मला वाटते की, ‘आम्हा दोघांना हे समजले आहे की, हे लोक एकमेकांना अशा प्रकारे ओळखतात की कदाचित त्यांच्या आयुष्यात इतर कोणीही त्यांना इतके खोलवर ओळखत नसेल. त्यामुळेच एका नॉन इंटीमेट सीनमध्येही आमची शारीरिकता अशी होती की, आम्ही एक होतो. आमच्यासाठी सेटवर एक इंटिमसी को-ऑर्डिनेटर होता, पण अरुणिमाने आम्हा दोघांसाठी खूप कंफर्टेबल बनवले.” असे तमन्ना हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले. (bollywood actress tamannaah bhatia reacts on intimate scene in jee karda with suhail nayyar said why this is important )

अधिक वाचा-
घटस्फोटानंतर चारू असोपा अन् राजीव सेन पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्याने केला माेठा खुलासा

Death Anniversary: अनिता गुहा यांचा शेवटचा काळ होता वेदनादायक, अभिनेत्री आजार लपवण्यासाठी घ्यायची हेव्ही मेकअपचा आधार

हे देखील वाचा