कॉमेडी टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आज घरोघरी लोकप्रिय आहे. हा टीव्ही हो २००८ पासून प्रसारित होत असून, आजही तो टीआरपीच्या शर्यतीत चांगल्या मालिकांना स्पर्धा देत आहे. या कॉमेडी टीव्ही सीरियलमध्ये जेठालालच्या भूमिकेतील दिलीप जोशीपासून (Dilip Joshi) ते बबिता जीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता (Munmun Datta) आणि तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) अर्थातच मिस्टर अय्यर अशा एकापेक्षा एक व्यक्तिरेखा दिसत आहेत. आज आपण केवळ अभिनेता तनुज महाशब्देबद्दल बोलणार आहोत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये बबिता जी आणि मिस्टर अय्यर पती-पत्नीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहेत. टीव्हीवर न जुळणारी ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तर जेठालाल बबिता जीवर पूर्णपणे भाळलेला आहे आणि तिला प्रभावित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. (taarak mehta ka ooltah chashmah babitaji husband mr iyer real life interesting facts)
शोमध्ये असेही दाखवण्यात आले आहे की, जेठालालला कधीकधी वाटते की मिस्टर अय्यर खूप भाग्यवान आहे, कारण त्याच्या आयुष्यात बबिता जी आहे. विशेष म्हणजे, तनुज महाशब्देने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पटकथा लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
जेव्हा शोच्या निर्मात्यांनी मुनमुन दत्ताच्या म्हणजेच बबिता जीचे पती मिस्टर अय्यरच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली, तेव्हा तो स्वतः ही चकित झाला होता. एका मुलाखतीत तनुज महाशब्दे म्हणाला होता की, “इतक्या सुंदर स्त्रीच्या जोडीदाराची भूमिका मी करणार आहे, हे फक्त बाकीच्यांनाच नाही तर मलाही पचवता आले नाही.” तनुजने खऱ्या आयुष्यात अद्याप लग्न केलेले नाही आणि त्याचे वय ४७ वर्षे आहे.
हेही नक्की वाचा-
- ‘या’ व्यक्तीने बिग बॉस फेम अर्शी खानच्या पोटात मारला जोरदार पंच, विव्हळत कोसळली खाली
- Video: देश बदललाय पण संस्कार तेच! परदेशी स्वयंपाक्यालाही प्रियांकाने आरती करायला शिकवले
- परिणीती चोप्राच्या भावाने उघडले रेस्टॉरंट, अभिनेत्री म्हणाली ‘मस्त खाल्ली बिर्याणी, दाल मखनी..’
हेही पाहा-