Saturday, June 29, 2024

बापरे! ‘तारक मेहता…’मधील दयाबेन ‘या’ घातक आजाराशी देतेय झुंज, चाहत्यांना लागलीय काळजी

टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ ( Tarak Mehta Ka Ulta Chashma) हा प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला होता. या कार्यक्रमाने अनेक वर्ष चाहत्यांना हसवले आहे. अनेक वर्षापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनामध्ये भरला आहे. यामधील पात्र देखिल खूपच प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सगळ्यात वेगळं आणि जिच्या आवाजाने पोट धरुन हसायला भाग पाडणारं पात्र म्हणजे दयाबेन. या अभिनेत्रीचे खरे नाव दिशा वकानी (Disha Vakani) आहे, पण तीला दयाबेन नावाेच चाहते जास्त ओळखातात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ म्हणलं की, जेठालाल आणि दयाबेनची जोडी आठवते. या मालिकाने आख्या भारताला वेड लावले आहे. मात्र, या मालिकामधील अनेक अशी पात्र आहेत, जे हा कार्यक्रम सोडून गेले आहेत. या मालिकाचे नवीन भाग चाहत्यांना फार काही आवडत नाही. यामध्ये सगळ्यांनाच आवडणारे पात्र म्हणजे दयाबेन म्हमजेच दिशा वकानीने 2017 साली प्रेग्नेंट असल्यामुळे तिने कार्यक्रमाला राम राम ठोकला. तेव्हापासून ती मालिकामध्ये झळकली नाही. मात्र दिशा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेही आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सध्या सोशल मीडियावर दिशाचा एक जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दिशा या व्हिडिओमध्ये एका मुलाखतीत दिसत आहे, ज्यामध्ये ती वेगवेगळे आवाज काढून दाखवत आहे. ते आवाज चालूच ठेवण्यासाठी ती त्रस्त दिसून येत आहे. तिने सांगितलेही होते की तिला वेगवेगळे आवाज काढताना त्रासही होतो. तिच्या व्हिडिओला पाहून ती कॅन्सरसारख्या भयानक आजाराला झुंज देत आहे असे दिसून येत आहे. सगळ्यांना हसवणारी अभिनेत्री आज स्वत:च एवढ्यामोठ्या आजाराला सामोरे जात आहे. मात्र, यावर अभिनेत्रीने अजून काहीच वक्तव्य दिले नाही, त्यामुळे ही बातमी अफवा असल्याचे दिसून येत आहे.

दिशा वकानी या अभिनेत्रीने 2010 मध्ये एका मुलाखतीदरम्यान दयाबेनचा आवाज काढताना तिला खूप त्रास होत आहे, याचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की ती सतत एकच आवाज काढनं खूपच कठीण आहे. त्यामुळे ती देवाचे आभार मानत आहे की, यामुळे तिच्या आवाजावर काहिच प्रभाव पडला नाही. दिशा 11 ते 12 तास शुटिंग करत होती. आता मात्र, या कार्यक्रमाला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही. यामध्ये अनेक पात्र बदलले आहे. तारकमेहताची भुमिका निभवणारा कलाकार शैलेश लोढा ( shailesh lodha) याच्या भुमिकेला सचिन श्रॉफ तारकची भुमिका करत असल्यामुळे प्रेक्षक खुपच चिडले आहेत. आता पुन्हा एकदा दयाबेनच्या भुमिकेसाठी देखिल ऐश्वर्या सखुजा आणि काजल पिसल या अभिनेत्रींचे नावे समोर येत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर ‘बिग बॉस मराठी’च्या आवाजामागील खरा चेहरा समोर आलाच, जाणून घ्या कोण आहे तो
बादशाह ‘या’ पंजाबी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, वर्षभरापासून करत आहे डेटिंग !

हे देखील वाचा