शाहरुख खानच्या ‘पठाण‘ चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या गाण्यात दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर सर्वत्र टीका होत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दीपिकाच्या बोल्ड मूव्ह आणि शाहरुखसोबतचा तिचा रोमान्स अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. वीएचपी आणि आरएसएसनेही या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. ‘बेशरम रंग’ने एकीकडे खळबळ उडवून दिली आहे, तर दुसरीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मधील बबिता जी (मुनमुन दत्ता) हिने या गाण्यावर मनसोक्त डान्स केला आहे. कोणाचीही पर्वा न करता तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. युजर्सनीही तिच्या डान्सवर आपल्या भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनेक अभिनेत्रींनी दीपिका पदुकोण (deepika padukone) हिच्या डान्स मूव्हज कॉपी करून त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. याद्वारे अभिनेत्री तिला साथ देताना दिसत आहे. हिना खान, अवनीत कौर, जन्नत जुबेरसह अशा अनेक अभिनेत्री या गाण्यावर डान्स करताना दिसल्या. आता या यादीत मुनमुन दत्ता (munmun dutta) हिचे नावही सामील झाले आहे.
View this post on Instagram
मुनमुन दत्ताने ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स करण्यासाठी मेटॅलिक रंगाचा पोशाख परिधान केला होता. मुनमुन दत्ताने या दमदार डान्स व्हिडीओला कॅप्शन दिले आहे की, “हे गाणे पूर्णपणे वाईब आहे.” यासोबतच चाहत्यांनी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत म्हंटले की, “हा खास व्हिडिओ केवळ जेठालालसाठी आहे. जेठालाल खूप स्पेशल आहे.” त्याचवेळी काही लोकांनी असेही म्हटले की, मुनमुन दत्ता दीपिका पदुकोणपेक्षा चांगला डान्स करते. मात्र, काही युजर्सनी अभिनेत्रीच्या बाॅडीवर कमेंट केल्या आहेत. एका युजरने अभिनेत्रीच्या बाॅडीवर कमेंट करत म्हंटले की, “किती जाड झाली आहे.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “आंटी, चित्रपट फ्लॉप होईल.” ( taarak mehta ka ooltah chashmah fame babita ji aka munmun dutta dance on pathaan song besharam rang)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Shriram Lagoo Birth Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील
हॅपी बर्थडे रितेश : आर्किटेक्ट ते बॉलिवूडचा ‘फॅमिली मॅन’, वाचा मराठमोळ्या रितेश देशमुखचा ‘अभिनय प्रवास’