Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

पोपटलालला मिळेना बायको, पण शोमधील ‘हा’ कलाकार साखरपुडा होऊनही अनेक वर्षांपासून अविवाहित

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा एक अतिशय लोकप्रिय शो आहे. म्हणूनच या कॉमेडी शोसंबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. विशेषत: ‘पोपटलाल’च्या लग्नाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर चाहते अनेकदा याबाबत प्रश्न देखील विचारतात. मात्र, आता या शोमध्ये एक अशी व्यक्तिरेखा आहे, ज्याला मुलगी पसंत पडली आहे, त्याचा साखरपुडादेखील झाला आहे. तरीही त्याचे वर्षोनुवर्षे लग्नच होत नाहीये. तो दुसरा कुणी नसून सर्वांचा आवडता ‘बाघा’ आहे.

बावरीला बाघा आवडतो?
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) शोमध्ये बाघाला बावरी आवडते आणि त्याने तिच्यासोबत साखरपुडाही केला आहे. चाहत्यांना या दोघांची अनोखी जोडी खूप आवडते. मात्र, 14 वर्षांमध्ये त्यांचे लग्न झालेले नाही. पोपटलालने लग्न होत नाहीये, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण बाघाच्या लग्नाला उशीर का होतोय, याबद्दल प्रेक्षक खूप संभ्रमात आहेत.

बावरीने केला शाेला अलविदा?
बावरीचे पात्र बऱ्याच काळापासून शोमध्ये दिसले नाही. याचे कारण म्हणजे बावरी म्हणजेच मोनिका भदौरिया हिने शोला अलविदा केला आहे. मोनिका बावरीची व्यक्तिरेखा खूप पसंत केली जात होती, पण तिने मध्येच शो सोडला. माध्यमांतील वृत्तांनुसार, तिने पगार वाढवण्याची मागणी होती, जे निर्मात्यांना मान्य नव्हते. म्हणून तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सोडणे योग्य समजले. त्यामुळे हे पात्र तेव्हापासून शोमध्ये परतले नाही.

सर्वाधिक काळ चालणारा शो
छोट्या पडद्यावर सर्वाधिक काळ चालणाऱ्या शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा समावेश होतो. हा शो 2008 सालापासून अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजेच तब्बल 14 वर्षे हा शो सुरू आहे. हा भारतातील सर्वाधिक काळ चालणारा हिंदी टीव्ही शो आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘लगता है हातों में रह गये तेरे हात’, शहनाझच्या गाण्याने चाहत्यांना आली सिद्धार्थची आठवण
रितेश देशमुखने अभिनेता करण जोहरला खेचले कोर्टात, पाहा काय आहे प्रकरण
बापरे! सोनू सूदला चाहत्याने दिले रक्ताने बनवलेले पेंटिंग, अभिनेत्याने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

हे देखील वाचा