‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ टीव्ही इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि जुना शो म्हणून ओळखला जातो. मागील १४ वर्षांपासून हा शो अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र नुकतेच मालिकेत मिसेस रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालने शोच्या निर्मात्यांवर असित मोदींवर यौन शोषणाचा आरोप गंभीर आणि मोठा आरोप लावला आहे. या आरोपामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता यावर मालिकेत भिडे मास्टर ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मंदार चांदवडकर यांनी त्यांचे मत दिले आहे.
एका मोठ्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मंदार चांदवडकर यांनी जेनिफरने असती मोदींवर लावलेल्या आरोपणांवर बोलताना सांगितले की, “मला आश्चर्य वाटते की त्यांनी असे का केले? मला काहीच कल्पना नाही की त्या दोघांमध्ये नेमके काय झाले? कोणता वाद झाला? सेटवर पुरुष मक्तेदारीसारखे काहीच नाही. उलट सतत सेटवर आनंदाचे खेळीमेळीचे वातावरण असते. जर सेटवर चुकीचे किंवा चांगले वातावरण नसते तर हा शो इतकी वर्ष का चालला असता?” असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
दरम्यान जेनिफर मिस्त्रीने मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती मालिकेसाठी शूटिंग करत नाही. ७ मार्च रोजी तिने शेवटचे शूटिंग केले आहे. २०१९ पासून तिच्यासोबत असे काही घडत असल्याचे तिने सांगितले. आता यावर जेनिफर इतके दिवस शांत का होती आणि आता तिने हे आरोप का लावले? असे प्रश्न विचारले जात आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’
सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये अभिनेत्याला नाकारले गेले, ‘या’ चित्रपटाने रातोरात बनवले स्टार