टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ने गेल्या १४ वर्षांपासून स्वतःचे स्थान राखून ठेवले आहे आणि टीआरपीच्या बाबतीतही नेहमीच पुढे आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता गेल्या अनेक वर्षांपासून ‘जेठालाल’च्याच नव्हे, तर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. शोमधील ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे बोल्ड लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या बोल्ड मूव्ह्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून जेठालालचेही हृदय धडधडणार आहे.
सनी लिओनीच्या गाण्यावर लावले ठुमके
मुनमुन (Munmun Dutta) ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक आहे. हा शो २००८ पासून सुरू असून अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली बबिता जी सनी लिओनीच्या गाण्यावर ठुमके लावताना दिसली आहे.
शॉर्ट ड्रेसमध्ये दाखवल्या बोल्ड मूव्ह्ज
सनीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पनघट’ या गाण्यावर मुनमुनने जबरदस्त डान्स केला. मुनमुनचा डान्स पाहून चाहते खुश झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुनमुनने सिल्व्हर कलरचा शिमरी वन पीस ड्रेस परिधान केला आहे. त्याचबरोबर तिने केस मोकळे सोडले आहेत. चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.
चाहत्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये केला प्रेमाचा वर्षाव
मुनमुनच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “उफ बबिता जी… मी कंट्रोल करू शकत नाही.” दुसर्याने लिहिले की, “नाच मेरी रानी नाच…” आणखी एका युजरने लिहिले की, “जेठालाल हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहे.” हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो व्यतिरिक्त मुनमुन दत्ता अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. कामाच्या आघाडीवर, मुनमुन या आठवड्यात रियॅलिटी टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसली. ती इतर लोकप्रिय टीव्ही कलाकारांसह विशाल सिंग, सुरभी चंदना आणि आकांक्षा पुरी आली. मुनमुन दोन दिवस ‘फेक हाऊस’मध्ये राहिली आणि ‘तिकीट टू फिनाले वीक’ टास्कमध्ये स्पर्धकांना आव्हान दिले.
हेही वाचा-
- सुपरस्टार महेश बाबूवर भडकले रश्मिका मंदानाचे चाहते, सोशल मीडियावर व्यक्त केला जातोय संताप
- लग्न, अफेअर किंवा गर्भधारणाच नाही, तर खूपच मोठी आहे नुसरत जहाँशी संबंधित वादांची यादी
- जेव्हा प्रभासने बसमधील गुंडाची केली होती जोरदार धुलाई, पाहुन विसरून जाल ‘बाहुबली’ची फाईट
हेही पाहा-