Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुनमुन दत्ताचे अटक करण्याच्या अफवांवर स्पष्टीकरण; म्हणाली, ‘मी फक्त चर्चेत येण्यासाठी…’

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ फेम मुनमुन दत्ताने आपल्या अटकेच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने त्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्याबद्दल तिच्याविषयी बातम्या येत होत्या. मुनमुनबद्दल रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की, हरियाणाच्या हांसीमध्ये एक युट्यूब व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर तिला अटक झाली होती. तिच्यावर आरोप होता की, तिने या व्हिडिओत जातीयवादी वक्तव्य केले होते, ज्यावर वाद निर्माण झाला होता. आता याविषयी मुनमुनने आपली बाजू मांडली आहे. सोबतच तिने सांगितले आहे की, तिला अटक करण्यात आली नव्हती.

नियमित चौकशीसाठी बोलावलं होतं
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मुनमुन म्हणाली की, “अफवांनुसार मला ‘अटक’ करण्यात आलं होतं, मला हे स्पष्ट करायचंय की, मी पोलीस अधिकाऱ्यांकडे नियम चौकशीसाठी गेले होते. मला अटक करण्यात आली नव्हती. खरं तर मला चौकशीसाठी जाण्यापूर्वीच शुक्रवारी न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. हांसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला अडीच तास या प्रकरणाविषयी चर्चा केली आणि सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद करून घेतल्या. ते खूपच नम्र आणि चांगला व्यवहार करणारे होते. मी पोलिसांना सहकार्य करत आहे आणि यापुढेही करत राहील.”

खोट्या बातम्या न परवण्याचे केले आवाहन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आपल्या पात्राने सर्वांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री मुनमुन पुढे बोलताना म्हणाली की, “मी फक्त चर्चेत येण्यासाठी पसरवण्यात येणाऱ्या गोष्टींनी खूप चिंतेत आहे. तसेच, मी मीडियाना विनंती करते की, या प्रकरणाभोवती खोट्या बातम्या पसरवू नयेत. बर्‍याच पोर्टल्सद्वारे वापरल्या जाणार्‍या क्लिकबेट हेडलाईन्स आणि थंबनेल हे खूपच त्रासदायक आणि अनैतिक आहेत.” तिने पुढे  रिपोर्टच्या वेळी ती “सेटवर तिच्या शोची शूटिंग करत होती,” असेही सांगितले.

मुनमुन आणि जेठालालची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते
मुनमुन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘बबिता जी’ हे पात्र साकारते. तिच्या या पात्राने तिला घराघरात ओळख मिळवून दिली आहे. विशेष म्हणजे, मालिकेत तिच्या आणि जेठालालच्या केमिस्ट्रीने तर या शोला आणखीनच प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडते. या दोघांवर सोशल मीडियावर खूप मिम्सही व्हायरल होतात.

सर्वाधिक काळ चालणारा टीव्ही शो
विशेष म्हणजे, हा शो २८ जुलै, २००८ साली सुरू झाला होता. या शोने आतापर्यंत ३३०० हून अधिक एपिसोड पूर्ण केले आहेत. तसेच, हा शो सर्वाधिक काळ चालणारा टीव्ही शो म्हणूनही ओळखला जातो.

हेही वाचा-

हे देखील वाचा