Monday, April 21, 2025
Home टेलिव्हिजन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पोपटलालला कमी लेखू नका, हॉलिवूडमध्ये केलंय काम!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पोपटलालला कमी लेखू नका, हॉलिवूडमध्ये केलंय काम!

टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका माहित नाही असा व्यक्ती सापडणे कठीण आहे. घराघरात ही मालिका पोहचली असून या मालिकेतील सर्वात मनोरंजक पात्रांबद्दल बोलायचे झाल्यास त्यात पोपटलालचा (Popatlal) उल्लेख नक्कीच होतो. पोपटलाल हे असे एक पात्र आहे जे अजूनही बॅचलर असून लग्नासाठी व्याकूळ आहे. पण मुलगी मिळत नाहीये. पोपटलालचे पात्र साकारणारा श्याम पाठक(Shyam Pathak) याने आतापर्यंत फक्त ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च केला असे तुम्ही समजत असाल तर तसे नाहीये. त्याने हॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत श्याम पाठक गेली 15 वर्षे पोपटलालची भूमिका साकारत आहेत. त्याच्यासोबत नेहमीच छत्री असते. शाम पाठकचं स्वप्न अभिनेता होण्याचं होतं आणि आज त्याने हे स्वप्न साकार केले आहे. श्याम पाठकने फक्त ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम केलं असं तुम्ही समजत असला तर तो तुमचा गैरसमज आहे. शाम पाठकने हॉलिवूडच्या चित्रपटातही काम केले आहे. श्याम पाठकचा दमदार अभिनय पाहायचा असेल तर एकदा हॉलीवूडचा लस्ट कॉशन हा चित्रपट नक्की पाहा.

 

View this post on Instagram

 

हॉलिवूड चित्रपटात महत्त्वाची भूमिका
शाम पाठकने लस्ट कॉशन चित्रपटात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. 2007 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये पोपटलालची भूमिका साकारण्यापूर्वी श्याम पाठकने लस्ट कॉशन नावाच्या चीनी चित्रपटात काम केले होते. विशेष म्हणजे या चित्रपटात अनुपम खेर देखील होते. श्याम पाठक याच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणे हे स्वप्नापेक्षा कमी नव्हते. या चित्रपटात श्याम पाठक अगदी वेगळ्या लूकमध्ये असून तो अस्खलित इंग्रजी बोलताना दिसला. पोपटलालने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

श्याम पाठकचे इतर शो
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’पूर्वी श्याम पाठक इतरही अनेक शोमध्ये दिसला आहे. यात सुख बाय चान्स, जसुबेन जयंतीलाल आणि जस्सी जैसी कोई नहीं यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तो दिसला होता. पण त्याला सब टीव्हीच्या तारक मेहता यांनी प्रसिद्धी दिली. यात त्याने आपल्या अभिनयाने पोपटलालचे पात्र एका वेगळ्या स्टेजवर नेले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! सुकेश गुन्ह्यात अडकलाय, हे माहित असूनही जॅकलिनने त्याच्याशी तोडले नव्हते संबंध; स्वप्नातील…
ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडेला पाहून संतापले प्रेक्षक; म्हणाले, ‘मूड खराब…’
‘कौन बनेगा करोडपती’ व्हायरल प्रोमो, कोल्हापूरच्या गृहीणीने मिळवला पहिली करोडपती होण्याचा मान

हे देखील वाचा