काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोच्या निर्मात्यांवर आणि इतर लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि सगळीकडे एकच धमाका झाला. जेनिफरच्या या खुलाशानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या शोने जेनिफरला पॅन इंडिया मोठी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली. तिची भूमिका देखील चांगलीच लोकप्रिय ठरली. असे असूनही तिने केलेले हे आरोप अनेकांच्या पचनी पडले नाही आणि आता यावर विविध मत उमटताना दिसत आहेत. या मोठया आरोपांसोबतच जेनिफरने तिला शिवीगाळ केल्याचे देखील सांगितले असून, तिने मार्चपासून मालिकेचे शूटिंग बंद केले आहे. या मालिकेचे माजी दिग्दर्शक असलेल्या मालव राजदा यांनी आता यावर मत व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीमध्ये मालव राजदा यांनी सांगितले की, “मी तिच्यासोबत १४ वर्ष काम केले आहे. ती सेटवरील सर्वात आनंदी आणि खुशमिजाज व्यक्तींपैकी एक आहे. तिची वागणूक प्रत्येक व्यक्तीसोबत खूपच चांगली आहे. मग टेक्निकल टीम असो, डायरेक्शन टीम असो, डीओपी असो, हेयर-मेकअप असो किंवा तिचे को-स्टार्स. सर्वांसोबतच तिचे अतिशय चांगले नाते आहे. तिने कधीच माझ्यासमोर सेटवर कोणासोबत भांडण केले नाही की शिवीगाळ केली नाही.
असित मोदींनी जेनिफरवर ती बेशिस्त असल्याचा आरोप करत इतरही अनेक आरोप केले. मुलाखतीमध्ये मालव पुढे असित मोदींनी जेनिफरवर केलेल्या आरोपांबद्दल सांगितले, “जिथंपर्यंत सांगितले जात आहे की ती सेटवर उशिरा यायची. पण मला आठवते की, मागील १४ वर्षांमध्ये ती माझ्यासमोर कधीच उशिरा आली नाही. कधी तिच्यासाठी शूटिंगमध्ये नुकसान झाले असे झाले नाही. शोमधील इतर कलाकार उशिरा यायचे मात्र जेनिफर नाही.” आता या खुलाशानंतर या प्रकरणात कोणते नवीन वळण येते ते पाहावे लागेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-