Friday, July 5, 2024

TMKOC: जेठालाल झाला गंभीर जखमी, तर ‘यामुळे’ पोलिसांना करावी लागली गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाली आहे. त्या मालिकेत प्रत्येक मुद्दा प्रेक्षकांना त्यांच्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत असतात. शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले आहे. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच कोव्हिड -१९ लसीकरण मोहीम पूर्ण झाली आहे. पण आता जेठालाल जखमी झाला आहे.

गोकुळधाम सोसायटी येथे आयोजित केलेली कोव्हिड -१९ लसीकरण मोहीम अखेर यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या लसीकरण मोहिमेबद्दल अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीलाही इंस्पेक्टर चालू पांडे आणि त्यांच्या टीमने पकडले आहे. आता सोसायटीमध्ये आनंदी वातावरण आहे आणि चालू पांडेसह सर्व गोकुळधाम रहिवासी अतिशय खुश झाले आहेत. पण या सगळ्याच्या दरम्यान, जेठालाल काही काम करत असताना घसरून खाली पडला आणि जखमी झाला आहे.

जेठालाल झाला जखमी
जेठालालला अजूनही खात्री पटली नाही की, त्याचे कोविड -१९ लसीकरण अगदी सहज केले गेले आहे. त्याला प्रचंड आनंद झाला आहे. या आनंदात तो घरी पोहोचतो आणि जात असताना घसरून खाली पडतो. या दरम्यान, तो त्याच हातावर पडतो ज्यावर त्याने लस घेतली आहे, त्यामुळे त्याचा हातात खूप दुखतो. आता घरी फक्त बापूजी आहेत आणि त्यांना एकट्याला जेठालालला सांभाळणे कठीण जात आहे. ते कसे तरी डॉ. हाथीला फोन करून घरी बोलावतात. आता ही जखम किती खोल आहे, हे फक्त डॉ.हाथीच सांगू शकतात.

गोकुळधाम सोसायटीवर आले होते संकट
काही लोकांनी सोसायटीच्या बाहेर पोस्टरवर लिहिले होते की, गोकुळधाम सोसायटीच्या कोव्हिड -१९ लसीकरण शिबिराची लस बनावट आहे आणि कोव्हिड -१९ लसीच्या नावाखाली प्रत्येकाला भेसळयुक्त इंजेक्शन दिले जात आहेत. हे पोस्टर पाहून गोकुळधामचे लोक स्तब्ध झाले होते. हे कोणी आणि का केले हे कोणालाच समजू शकत नाही. त्यानंतर ते पोलिस इंस्पेक्टर चालू पांडेला फोन करतात. पण त्याच्या अगोदरच पोलिसांना माहिती मिळते आणि ते त्याची चौकशी करून गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक करायला पोलिस येतात. आता आगामी भाागात पोलिस कोणाला पकडतील याची वाट पाहावी लागणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा