Monday, July 1, 2024

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, टेलिव्हिजनच्या जगात कॉमेडी शोचा बादशहा गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. चाहते नेहमीच या शोच्या प्रत्येक कलाकाराला खूप प्रेम व प्रतिसाद देत असतात. जेठालाल आणि दयाबेन यांची बातच अनोखी आहे. जेठालालची पत्नी दयाबेनने शो सोडल्यापासून चाहते तिला सतत मिस करत आहे. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज जाहीर केले आहे. आता हा शो प्रेक्षकांना नेहमीपेक्षा जास्त हसवणार आहे.

५ नाही तर ६ दिवस होणार प्रसारित
आतापर्यंत, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो प्रेक्षकांना आठवड्यातून ५ दिवस हसवत होता, तो आता ६ दिवस प्रसारित होणार आहे. म्हणजेच, हा शो आता सोमवार ते शनिवार सर्व नवीन भागांसह टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. चॅनेल सोनी सबने विशेष ‘महासंगम शनिवार’च्या घोषणेसह हा शो आठवड्यातून सहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

३२०० भाग केले पूर्ण
या कॉमेडी शोने ३२०० भाग पूर्ण केले आहेत. हा शो गेल्या १३ वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. ही खुशखबर ऐकल्यावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चाहते आनंदाने उड्या मारतील. कारण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा हा शो आता ५ नव्हे, तर ६ दिवसांसाठी येणार आहे. गोकुळधाम सोसायटीच्या कुटुंबांची कथा शोमध्ये दाखवली आहे. जिथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. सोसायटीत दररोज एक नवीन समस्या येते, जी प्रत्येकजण मिळून सोडवतो. पण या संपूर्ण मालिकेच्या दरम्यान हास्य शाबूत राहत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेला मिळाली दयाबेन, मोठ्या दयाबेनने शेअर केला व्हिडिओ

-लाडक्या नट्टु काकांना निरोप देताना तारक मेहताची टीम झाली भावूक, जेठालालला अश्रू अनावर….

-‘बबिताजी’ला जेठालालनेच मिळवून दिला ‘तारक मेहता…’, शोमधील ९ वर्षे लहान व्यक्तीसोबत जोडले गेले अभिनेत्रीचे नाव

हे देखील वाचा