टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय शो असलेल्या तारक मेहता का उलटा चश्मा मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शो मधील कलाकार देखील प्रेक्षकांच्या चांगलेच परिचयाचे झाले असून, प्रेक्षक त्यांच्यावर अमाप प्रेम करतात. शोमध्ये आजच्या घडीला अनेक कलाकार नवीन आले असले तरी देखील शोची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. मागच्या वर्षी या शोमधील सर्वात लोकप्रिय कलाकार असलेले आणि शमध्ये तारक मेहता ही मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली. निर्मात्यांमुळे त्यांनी ही मालिका सोडल्यास स्पष्ट केले होते.
तब्बल १४ वर्ष त्यांनी या मालिकेत काम केल्यानंतर अचानक मालिका सोडल्यामुळे अनेक चर्चाना उधाण आले होते. शो सोडल्यानंतरही शैलेश आणि निर्माते असित मोदी यांच्यात काहीही आलबेल नाही. दोघांमध्ये सोशल मीडियावर सतत शाब्दिक युद्ध पाहायला मिळते. यातच शैलेश यांनी त्यांच्या थकीत मानधनाबद्दल आता कायद्याचा आधार घेतला. यावर असित मोदी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
शैलेश यांनी असित मोदी यांच्यावर लावलेल्या आरोपांवर उत्तर देताना असित यांनी म्हटले की, “मला नोटीस मिळाल्यानंतर धक्का बसला. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कोणत्यापण कंपनीमध्ये असे थकीत बाकी असतात. असे जरूर होते. जेव्हा तुम्ही एका कुटुंबासारखे अनेक वर्ष काम करतात तेव्हा तुमच्यामध्ये काही असहमती, छोटे वाद नक्कीच होतात. मी त्यांच्याशी कधीच बजेट वागलो नाही उलट त्यांच्या नेहमीच सन्मान केला आहे. मी त्यांना मध्यवर्ती भूमिका देऊन एक जोखीम उचलली होती. कारण ते अभिनेता नव्हते. त्यांनी शो सोडला आम्ही त्यांना जायला सांगितले नव्हते.”
असित मोदी यांनी हे देखील सांगितले की, जेव्हा त्यांना समजले की शैलेश शो सोडणार आहे, तेव्हा त्यांच्या टीमने त्यांना तीन महिन्याच्या नोटीस पिरियडबद्दल देखील सांगितले होते. मात्र त्यांनी नकार दिला. त्यांनी असित मोदी किंवा त्यांच्या टीमसोबत कोणतीही मीटिंग करण्यासाठी नकार देखील दिला. शिवाय शो सोडण्याची कोणतीही औपचारिकता पूर्ण देखील केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”
‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल