Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

तबस्सुम यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे (दि, 18 नोव्हेंबर) रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा होशांग याने शुक्रवार रात्री 8 : 40 च्या दरम्यान माहिती दिली की, कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीपासून बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नुकतंच बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.

शनिवारी संध्याकाळी तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांच्य निधनाची बातमी समोर आल्यावर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक चात्यांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने बॉलिवूमध्येही दु:खाचे वातावरण पसरले असून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मोठा धक्का बसला. त्यापैकी अमिताभ बच्चन हे देखिल खूप दु:खी झाले आणि त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे तबस्सुम यांना श्रद्धांजली वाहिली.

tabassum govil

प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी नुकतंच सोशल मीडियावर एका ब्लॉगद्वारे दिवंगत अभिनेत्री तबस्सुम यांना श्रद्धाजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, “ऑलराउंडर का निधन हो गया। यह समझ से परे है… आप केवल आंखों और मन के सामने उनकी उपस्थिति और जीवन के समय को याद करते हैं…फूल खिलें हैं गुलशन गुलशन…वे सभी एक-एक कर हमें छोड़कर जा रहे हैं…” अमिताभ पुढे लिहितात की, “वे एक तस्वीर की तरह उनके जहन में रहेंगी, लोग हमेशा समय की एक इमेज बने रहते हैं…और फिर वे चले जाते हैं…लेकिन जीवन जारी रहता है”

 

View this post on Instagram

 

दुरदर्शनलरील सुत्रसंचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तबस्सुम यांचा जन्म 1944 साली बिहार पटनामध्ये झाला होता. त्यांनी 1950 साली एक बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रामध्ये पाय ठेवला होता. त्यांनी प्रथम चित्रपट (1950), दीदार (1951) और बैजू बावरा (1952) सागख्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी (1969), हीर रांझा (1970), जॉनी मेरा नाम (1970), और तेरे मेरे सपने (1971) सागरख्या गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! निर्मात्याने राहुल रॉयवर केला ‘हा’ माेठा आराेप, पाठवली कायदेशीर नाेटीस, वाचा सविस्तर
दु:खद! अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन, वयाच्या 24व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा