Friday, May 24, 2024

दु:खद! अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन, वयाच्या 24व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बांग्ला चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा हिचे निधन झाले. तिने अवघ्या 24व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री एंड्रिलाच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीच्या डोक्यात रक्त गोठले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. 15 नाेव्हेंबर)ला रात्री तिचे ऑपरेशन झाले आणि तेव्हापासून ती कोमात व्हेंटिलेटरवर होती.

अभिनेत्री 19 दिवस रुग्णालयात हाेती दाखल 
एंड्रिला शर्मा (andrila sharma) हिला ब्रेन स्ट्रोकमुळे 1 नोव्हेंबरच्या रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 दिवस ती जीवन-मरणाची लढाई लढत होती. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री एंड्रिलाला शनिवारी (दि. 19 नाेव्हेंबर)ला संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे तिची प्रकृती खालावत गेली. रविवारी (दि. 20 नाेव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्रीने दाेन वेळ केला कर्कराेगाचा पराभव
एवढ्या लहान वयात एंड्रिला शर्माला दोनदा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला, पण तिने हार मानली नाही आणि कॅन्सरशी लढाई जिंकली. जेव्हा अँड्रिया शर्माला दुसऱ्यांदा कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा तिच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यादरम्यान तिच्यावर केमोथेरपीचे सेशन झाले, त्यानंतरच डॉक्टरांनी ती पूर्णपणे बरी असल्याचे सांगितले.

एंड्रिलाने ‘झूमर’ टीव्ही मालिकेत केले पदार्पण 
एंड्रिला शर्माच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने टीव्ही ते ओटीटीपर्यंत काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ऐंद्रिला शर्माने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. ती पहिल्यांदा टीव्ही शो ‘झूमर’मध्ये दिसली आणि त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. (bengali actress andrila sharma passed away of brain haemorrhage she was only 24 years old)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बोलताना आपण तारम्य बाळगायला हवं! सुश्मिता सेनच्या पोस्टनंतर ट्रोलर्सला हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

भारत जोडो यात्रेमध्ये ‘या’ टीव्ही अभिनेत्रींनीही लावली हजेरी, व्हायरल होतोय व्हिडिओ

हे देखील वाचा