कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मेगा बजेट चित्रपटांचे प्रदर्शन दिवाळीपासून खुल्या चित्रपटगृहांमध्ये सुरू होत आहे. याची बोहनी’सूर्यवंशी’ या चित्रपटापासून होत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंगही खास भूमिकेत दिसणार आहेत आणि रणवीर सिंगच्या ‘८३’ चित्रपटातूनही वर्षाचा निरोप घेतला जात आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्या संघाच्या प्रयत्नांवर आधारित या चित्रपटासाठी सुनील गावस्करांची भूमिका करणारा अभिनेता ताहिर राज भसीन खूप उत्सुक दिसत आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात कपिल देव या पात्राची मुख्य भूमिका सुपरस्टार रणवीर सिंग साकारत आहे.
रणवीरच्या ‘८३’ चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणारा ताहिर म्हणतो की, “मी ‘८३’ चित्रपटगृहात येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्याचा प्रदर्शन दिवस किती छान असेल. आता ‘८३’ चित्रपटाचे प्रमोशन करण्याची वेळ आली आहे. कारण ते चित्रपटगृहाचे रूपांतर क्रिकेट स्टेडियममध्ये करणार आहे. जसे आपण स्टेडियममध्ये भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतो, तेच वातावरण चित्रपटगृहांमध्ये दिसून येईल.”
ताहिर म्हणाला की, “या चित्रपटात अंडरडॉग भारतीय संघ जगज्जेता कसा बनला याचे चित्रण करण्यात आले आहे. हा क्षण केवळ आपल्या क्रिकेट इतिहासातीलच नव्हे, तर जगभरात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी सर्वात मोठी उपलब्धी ठरला आहे. इतका मोठा आणि उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जबरदस्त मनोरंजन. कबीर सरांनी ‘८३’ चित्रपटात खूप मेहनत घेतली आहे. कारण, ते भारतीय क्रिकेट संघाशी खूप संलग्न आहेत, ज्यांनी आपल्या धैर्याने संपूर्ण जगाची मने जिंकली.”
या चित्रपटाव्यतिरिक्त ताहीर राज लवकरच अभिनेत्री तापसी पन्नूसोबत ‘लूप लपेटा’ या चित्रपटात आणि श्वेता त्रिपाठीसोबत ‘ये काली काली आंखे’ या वेब सीरिजमध्ये रोमँटिक हिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो
-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण
-शाहिद कपूर आणि अमृता रावच्या सुपरहिट ‘इश्क विश्क’ चित्रपटाचा येणार सिक्वल










