Saturday, July 6, 2024

हॉटनेसचा तडका! ताहिरा कश्यपचे हॉट फोटो पाहून चाहते तर सोडाच, पती आयुष्मानही झाला घायाळ

अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करते. आपल्या हॉट आणि दिलखेचक फोटोंनी ती चाहत्यांची मने जिंकते. अशात तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिने यावर एक लक्षवेधी कॅप्शनही लिहिले आहे. सध्या तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

ताहिरा पती आयुष्मान बरोबर सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सध्या ते दोघे मालदीवला आहेत. ताहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका जहाजामध्ये उभी आहे. तसेच तिच्या समोर निळेशार पाणी असलेला समुद्र आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची एक बिकिनी घातली आहे. यामध्ये ती खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी मी आहे, आणि मी माझं मन, शरीर आणि आत्मा जसे आहे तसे स्वीकारते. आजूबाजूचा निळा परिसर आणि स्वतःला पाहून मी माझ्या प्रेमात पडले आहे.” (Tahira Kashyap hot photos viral on social media)

तिचे हे फोटो आयुष्मानने क्लिक केले आहेत. तसेच पुढे तिने पती आयुष्मान बद्दल लिहिले की, “आयुष्मान म्हणाला ही तुझी सर्वात बेस्ट प्रोफाईल आहे.” तिच्या या फोटोवर चाहत्यांनी तूफान लाइक्सचा वर्षाव केला आहे. यामध्ये तिला काही कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. तसेच पती आयुष्मानने तिला यावर फायर ईमोजी पाठवले आहेत. अभिनेत्याच्या एका चाहत्याने तिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे की, “ताई तुझे झाले असेल तर आयुष्मानला चित्रपट बनवायला सांग. खूप दिवस झाले त्याचा नवीन चित्रपट नाही आला.”

ताहिराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये देखील ती समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहे. ताहिरा ही एक लेखिका आणि प्राध्यापिका आहे. साल २०११ मध्ये या दोघांनी विवाह केला. तसेच या दोघांना दोन मुले देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला लढाईचा अभिनय येतो, लढाई नाही’, आगामी चित्रपटात आयुष्मान खुराना बनणार ‘ऍक्शन हिरो’

-अभिनयासह आयुष्मानने गिरवलेत पत्रकारितेचेही धडे; तर ‘हे’ आहे अभिनेत्याचं खरं नाव

-रागात असलेल्या भुमीने जेव्हा आयुष्मान खुरानाला मारली होती ८ वेळा कानाखाली, मग अभिनेत्यानेही…

हे देखील वाचा